Sonam Raghuvanshi Raja Raghuvanshi Wedding Video Saam Tv News
क्राईम

Raja-Sonam Wedding Video : राजा-सोनम यांच्या लग्नाचा VIDEO आला समोर, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद उडालेला; मास्टरमाइंड निघाला...

Sonam Raghuvanshi Raja Raghuvanshi Wedding Video : आता सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अजिबात आनंदी दिसत नाहीये, त्यामुळे ती या लग्नामुळे आंनदी नव्हती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Prashant Patil

इंदूर : इंदूरमधील एक नवविवाहित तरुण Raja Raghuvanshi Murder प्रकरणानंतर पत्नी सोनम बेपत्ता झाली. या प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे पत्नी सोनमचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची मोठी माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोनमसह इतर ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोनमचे बाहेर प्रेमसंबंध असल्यानं हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सोनम पोलिसांच्या तावडीत कशी सापडली? ते समोर आलं आहे. दरम्यान, आता सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अजिबात आनंदी दिसत नाहीये, त्यामुळे ती या लग्नामुळे आंनदी नव्हती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनम आणि राजा बेपत्ता झाल्यावर लोक सहानुभूती व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत होते, पण आता लोक या व्हिडिओमधील सोनम आणि राजाच्या हावभावांकडे लक्ष देत आहेत. काही लोक म्हणतात की व्हिडिओमध्ये राजा रघुवंशी आनंदी दिसत आहेत, परंतु सोनमच्या चेहऱ्यावर ती आनंदी नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते, उलट तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत.

दरम्यान, अशातच आता पोलीस तपासातून नवी माहिती समोर आली आहे की, सोनमचं लग्नापूर्वीच राज कुशवाह नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे तिने तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला आणि कटाप्रमाणे निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेघालय पोलिसांनी एसआयटी स्थापन केली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन आरोपींना इंदूर आणि एकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगाव तालुक्यात १६ गाव ४४ वाड्या वस्त्यांना ३१ टँकरने पाणी पुरवठा

बायोमेट्रिक हजेरी, वर्गांमधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग; अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

Ladki Bahin Yojana : 80 लाख लाडक्या बहि‍णींचे १५०० कायमचे बंद, ४ महत्त्वाची कारणं आली समोर

महायुतीचं ठरलं! विधान परिषदेसाठी असा ठरला अंतिम फॉर्म्युला; जाणून घ्या कोणत्या पक्षाला कोणती जागा?

Kidney Health: BP, मानसिक ताण आणि चुकीच्या सवयींमुळे किडनीवर गंभीर परिणाम; डॉक्टरांनी दिलेली 'ही' माहिती नक्की वाचा

SCROLL FOR NEXT