Raja Raghuvanshi Case Mystery Saam Tv News
क्राईम

Raja Raghuvanshi : मला हिंदी समजलं नाही, पण हावभाव समजले अन् केस फिरली; सोनमचं पितळ उघडं पाडणारा अल्बर्ट पीडी कोण?

Raja Raghuvanshi Case Mystery : सोनमनं राजाला संपवण्यासाठी तिघांना २० लाख रुपये दिले होते. नोंग्रियाटहून मावलखियाटकडे जात असताना सोनमनं भावानसाई नावाच्या दुसऱ्या गाईडची सेवा घेतली. त्यामुळे अल्बर्ट सोनम आणि राजासोबत पुढे जाऊ शकला नाही.

Prashant Patil

इंदूर : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेलं इंदूरचं जोडपं मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अचानक बेपत्ता झालं. त्यांच्या शोधासाठी दुर्गम भागांमध्ये पोलीस पथकं पाठवण्यात आली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. पण हाती काहीच लागलं नाही. पोलीस अंधारात चाचपड होते. तपासाला दिशा मिळत नव्हती. पोलिसांच्या हाती काहीच लागत नसताना एका स्थानिक आल्यानं तपासाला दिशा तर मिळालीच, सोबतच एका धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा झाला.

लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर सोनम रघुवंशीनं तिचा पती राजाची हत्या केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांचे हात बरेच दिवस रिकामेच होते. अशा परिस्थितीत स्थानिक गाईड अल्बर्ट पी डी याची संपूर्ण प्रकरणात एन्ट्री घेतली. हत्याकांडाची उकल करण्यात अल्बर्टनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या जबाबामुळेच आज राजाचे मारेमरी गजाआड गेले आहेत. २२ मे रोजी सोनम आणि राजाला तीन पुरुषांसोबत पाहिलं होतं. ते नोंग्रियाटहून मावलखियाटकडे ३ हजारांहून अधिक पायऱ्या चढत जात होते, अशी माहिती गाईड असलेल्या अल्बर्ट यांनी पोलिसांना दिली.

'राजासोबत चार पुरुष पुढे चालत होते आणि सोनम त्यांच्या मागून चालत होती. ते सगळे हिंदीत बोलत होते. मला हिंदी नीट समजत नाही. पण त्यावेळी त्यांच्यात सुरु असलेलं संभाषण पाहता सगळं आलबेल नव्हतं. त्यामुळे मी याबद्दल पोलिसांना अलर्ट केलं,' अशी माहिती अल्बर्टनं दिली.

सोनमने राजाला संपवण्यासाठी तिघांना २० लाख रुपये दिले होते. नोंग्रियाटहून मावलखियाटकडे जात असताना सोनमने भावानसाई नावाच्या दुसऱ्या गाईडची सेवा घेतली. त्यामुळे अल्बर्ट सोनम आणि राजासोबत पुढे जाऊ शकला नाही. भावानसाईने सोनम आणि राजाला शिपारा होमस्टेपर्यंत सोडलं. तिथून तो परतला. मेघालय पोलिसांनी या केसला 'ऑपरेशन हनिमून' असं नाव दिलं होतं. या तपासात १२० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT