बायकोसोबत झालेल्या भांडणातून, नवऱ्याने स्वतःवर झाडली गोळी. Google
क्राईम

Crime : बायकोबरोबर कडाक्याचं भांडण, नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, स्वत:वरच झाडली गोळी

Crime News: पत्नी बरोबर झालेल्या वादातून पतीने गावठी कट्ट्यातून स्वतःच्या हनुवटीवर झाडली गोळी. गोळी लागलेला तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला पुणे येथील रुग्णालयात हलविले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे एका तरुणाने पत्नीशी झालेल्या वादानंतर गावठी कट्ट्याद्वारे स्वतःवर गोळी झाडून घेतली. सोमनाथ रामभाऊ वाकचौरे असे या तरुणाचे नाव आहे.

सततच्या होत असलेल्या वदामुळे सोमनाथची पत्नी कंटाळून आपल्या माहेरी चिंचोळी फाटा येथे राहण्यास गेली. सोमवारी सोमनाथ वाकचौरे हा चिंचोली फाटा येथे गेला आणि पत्नीशी वाद करत तिला मारहाण व दमदाटी केली. त्यामुळे पत्नीने त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पत्नीशी झालेल्या वादाच्या कारणावरून सोमनाथ वाकचौरे याने चिंचोली फाट्याजवळच गावठी कट्ट्याने स्वतःच्या हनुवटीखाली गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी गेले असता, तो रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावठी कट्टा जप्त केला. जखमी सोमनाथला ताब्यात घेऊन तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर सोमनाथची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT