Pune Husband Wife Crime Saam TV
क्राईम

Pune News: देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला बाहेरगावी नेलं; २५० फूट खोल दरीत फेकलं, पुण्यातील भयानक घटना

Satish Daud

Pune Husband Wife Crime

देवदर्शनाच्या बहाण्याने पतीने पत्नीला सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेलं. तिथे गेल्यानंतर २५० फूट खोल दरीत फेकून तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव पतीने रचला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तब्बल अडीज महिन्यांनी या खूनाचा छडा लावत आरोपी पतीला अटक केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोलसिंग याने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी बेपत्ता झाल्याची लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली होती. (Latest Marathi News)

त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी (Police) चौकशीसाठी आरोपी अमोलसिंग याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.

अमोलसिंगने कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर होते. त्याचे पत्नीशी वाद व्हायचे. वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले होते. मात्र, ललिताने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याने तो तिच्यावर चिडला होता.

त्यामुळे अमोलसिंगने पत्नीला संपवण्याचा कट रचला. ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोपीने पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेलं. तिथे गेल्यानंतर २५० फूट खोल दरीत फेकून तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव पतीने रचला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT