Telangana crime news Saam Tv
क्राईम

Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

Telangana crime news: तेलंगणातील कामारेड्डीमध्ये किरकोळ वादातून पतीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तेलंगणातील कामारेड्डी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पती पत्नीच्या किरकोळ वादातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एका कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्धस्त झाला आहे. पत्नीनेच पतीचा जीव घेतला असल्याचं समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ माजलीये.

वाम्बे कॉलनी परिसरा ही घटना घडलीये. कोदंडा शिवाजी नामक व्यक्ती दिहाडीवर काम करणारा मजूर होता. तो आपल्या पत्नी लक्ष्मी आणि दोन लहान मुलींसोबत भाड्याच्या घरात राहत होता. त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि रोजच्या मजुरीवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या दोन्ही मुलींचं वय दोन वर्षे आणि एक वर्ष इतकं आहे.

शनिवारी रात्री या जोडप्याचं जेवण बनवण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, जेवणात चिकन न बनवल्याने शिवाजी नाराज झाला होता. त्यातच घरच्या आर्थिक अडचणींमुळे तो काहीसा नैराश्यात होता. या दोन्ही गोष्टींमुळे पती-पत्नीमधील वाद अधिकच चिघळला.

हा किरकोळ सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर झाला. आरोपानुसार, संतापाच्या भरात लक्ष्मीने घरात असलेल्या धारदार हत्याराने शिवाजीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर गंभीर जखम झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी पत्नी लक्ष्मीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामारेड्डीचे सर्कल इन्स्पेक्टर नरहरी यांनी या घटनेची पुष्टी करत सांगितलं की, प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एका रात्रीत कुटुंब झालं उद्धवस्त

या घटनेमुळे एका रात्रीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold rate today : पितृपक्षापूर्वीच सोनं-चांदी अचानक स्वस्त! २ दिवसांत दरात एवढ्या हजारांची घसरण; पाहा आजचे नवे दर

Vastu Tips : तुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण करणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगत

Maharashtra News Live Update: देवरीत आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा....

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास; श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकलं

कोल्हापुरच्या बँकेत 40 लाखांचा घोटाळा; ग्राहकांच्या एफडीचे पैसे स्वतःच्या खात्यावर, ऑडिओ क्लिपनं फुटलं बिंग

SCROLL FOR NEXT