डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
विवाहितेशी प्रेमसंबंध ठेवून काढले ७० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ
२२ वर्षीय तरुणाने गाठला विकृतीचा कळस
मानपाडा पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या
विवाहितेशी मैत्री केली. गोडगोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यात पीडित विवाहित महिला अलगद अडकली. त्याचाच गैरफायदा घेऊन तिचे अश्लिल व्हिडिओ काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. डोंबिवलीत हा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार घडला आहे. अखेर ब्लॅकमेलिंग आणि वारंवार दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस ठाणे गाठले आणि तरुणाविरोधात तक्रार दिली. मानपाडा पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणावर गुन्हा नोंदवून त्याच्या मुसक्या आवळल्या.
संशयित आरोपी २२ वर्षांचा आहे. तो डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहतो. त्यानं एका विवाहित महिलेसोबत आधी ओळख वाढवली. तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला. पण मनात वेगळाच कट शिजत असलेल्या या तरुणाने मैत्रीच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानं प्रत्येक वेळी फेकलेला प्रेमाचा फास योग्य ठरला आणि पीडिता त्याच्या जाळ्यात अडकली. मैत्रीत विश्वासघात करत त्यानं तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.तिचे ७० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने विवाहित महिलेसोबत मैत्री केली. तिचा विश्वासघात केला. मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले. तिचे ७० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ काढले. काही दिवसांनी महिलेने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. आरोपी तरुणाला ते सहन झालं नाही. त्याने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तिच्यावर दबाव टाकू लागला. आरोपीने तिच्या पतीलाही फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला. तसेच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.