hinjewadi police investigating senior citizen women death case Saam Digital
क्राईम

Pune Crime News : पुण्यातील बावधनमध्ये महिलेचा खून, पाेलिसांचा पतीवर संशय

Pune : पती हा गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून खूनाचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad :

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बावधन (bawdhan pune) येथे एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तिच्या राहत्या घरात खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बावधान येथील विंड विल सोसायटी या ठिकाणी मध्यरात्री ही घटना घडली आहे. खून झालेल्या महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहिती अशी : आशा महेंद्र जैन (asha mahendra jain) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत तिचा पती महेंद्र हा देखील गंभीर जखमी झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशा जैन या पती महेंद्र, मुलगी आणि जावई यांच्य सोबत विंड विल सोसायटीमध्ये राहत. त्यांच्यावर काेयत्याने वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील संशयित म्हणून पाेलिस हे महेंद्र जैन यांची चाैकशी करणार आहेत. ते गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून खूनाचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT