Father Killed Accused Who Killed Son Saam Tv
क्राईम

Hingoli Crime News: 'खून का बदला खून' म्हणत लेकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बापाचं भयंकर कृत्य; हिंगोलीतील खळबळजनक घटना

Father Killed Accused Who Killed Son: हिंगोलीमध्ये एका वडिलांनी त्यांच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीचा खून केलाय. औंढा तालुक्यातील येळी गावात घडली आहे.

Rohini Gudaghe

संदिप नागरे, साम टीव्ही अकोला

आतापर्यंत 'खून का बदला खून' चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे. पण अशीच धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील येळी गावात वडिलांनी त्यांच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीची हत्या केली आहे. खुनाच्या घटनेत पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने 'खून का बदला' खून म्हणत आरोपीची हत्या केलीय. त्याने पोलीसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील येळी गावात झालेल्या खुनाच्या घटनेत पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सात महिन्यांपूर्वी स्वतःच्या मुलाचा खून (Hingoli Crime News) करणाऱ्या आरोपीचा जीव घेत बापाने मुलाच्या खुनाचा बदला घेतला आहे. केळी गावच्या शेतशिवारात गजानन अंकुश नागरे या तरुणाचा दोघाजणांनी मिळून खून केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर औंढा पोलीस स्थानकात दोन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी दोन्ही आरोपी कारागृहातुन सुटून बाहेर आले होते. मात्र, आपल्या मुलाचा खून करणाऱ्या दोन्ही (Father Killed Accused Who Killed Son) आरोपींविरोधात मृतकाच्या वडिलांच्या मनात राग होता. खून झालेला तरुण गजानन नागरे याचे वडील अंकुश नागरे यांनी काल सायंकाळी (२७ मे) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गोपीचंद मारुती आव्हाड याच्यावर हल्ला करत त्याचा जीव घेतला आहे.

दरम्यान पोलिसांनी खून करणाऱ्या अंकुश नागरे यांच्यासह एका आरोपीला अटक केली (Hingoli News) आहे. 'खून का बदला' खून म्हणत आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याची माहिती औंढा पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येळी गावात आरोपी गोपीचंद आव्हाड या तरुणाचा खून करत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका (Crime News) घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Maharashtra Live News Update : बदनामी थांबवा! पडळकर एफ सी रोड वर या

Nagpur News: नागपूरच्या पबमध्ये टेबलच्या वादातून राडा; तरुणाला बेदम मारहाण | VIDEO

SCROLL FOR NEXT