Hariyana Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : ४ महिन्यांचा संसार अर्ध्यावरती मोडला; नवऱ्याने बायकोला खोलीत नेलं अन् भयंकर घडलं

Haryana Crime News : गुरुग्राममध्ये पतीने पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप असून आरोपी फरार आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • गुरुग्राममध्ये नवविवाहित महिलेची पतीकडून हत्या

  • विषारी इंजेक्शन देऊन खून केल्याचा आरोप

  • हुंड्याच्या मागणीमुळे सतत छळ होत असल्याची माहिती

  • आरोपी पती फरार

Haryana Gurugram Kajal Murder By Her Husband Arun हरियाणातील गुरुग्राममध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायकोच्या माहेरच्या मंडळींनी हुंडा न दिल्याच्या रागातून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केले आहेत आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मृत महिलेचं नाव काजल असून तिचा ४ महिन्यांपूर्वी अरुण शर्मा या तरुणाशी विवाह झाला. काजल एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायची तर अरुण शर्मा हा त्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होता. या दोघांमध्ये लग्नाच्या १ महिन्यानंतर खटके उडत होते. काजलने याबद्दल तिच्या कुटुंबियांना माहिती दिली होती.

अरुण काजलकडे सतत हुंड्याची आणि पैशांची मागणी करून तिचा छळ करत होता. बुधवारी काजल आणि तिची नणंद दोघीच घरी होत्या. यादरम्यान अचानक तिथे अरुण आला आणि काजलला घेऊन खोलीत गेला. तिथे तिला एक विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केली.

थोड्या वेळाने काजलची नणंद तिथे पोहोचली, तेव्हा काजल जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती, तिच्या नाकातून रक्त वाहत होते आणि तिच्या हातावर इंजेक्शनची खूण होती. कुटुंबीयांनी तात्काळ काजलला एका खाजगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. आरोपी अरुण हा सध्या फरार असून पोलीस त्याला शोधत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खोपोली पोलिसात गोहत्या झाल्याची तक्रार

Maharashtra News Live Update: नागपूर जिल्ह्यातील धमणगावमधील विद्यामंदिरला भीषण आग

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक, अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्ग पूर्णत: बंद; VIDEO

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT