Hadapsar Fraud News Saam Tv
क्राईम

Pune Crime: एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, पुण्यात ६० लाख रूपयांची फसवणूक

Hadapsar Fraud News: हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एमबीबीएससाठी अॅडमिशन घेऊन देतो असे सांगून तब्बल ४० लाख रुपये एका व्यक्तीकडून घेतले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.वैद्यकीय प्रवेश देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाखांची फसवणूक केली आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश करुन देतो असे सांगून फसवणूक केली आहे. मुलीली एमबीबीएस करायचे होते. मी तुमचे अॅडमिशन करुन देतो असं सांगून आरोपीने एका व्यावसायिकाकडून ४० लाख रुपये घेतल्याची घटना समोर आली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने (वय ४९, मगरपट्टा) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा (वय २५) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. (Pune News)

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची एका व्यक्तीमार्फत आरोपींची ओळख झाली होती.आरोपींनी त्यांना मुलीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखविले. मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हटल्यावर वडिलांनीही पैसे देण्यास होकार दिला. त्यांनी आपल्या मुलीसाठी पैसे दिले. परंतु आरोपींनी हे पैसे दिलेच नाही. त्यांची फसवणूक केली.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करुन देतो असे सांगून त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात ६० लाख रुपये घेतले.परंतु प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर आरोपींनी २० लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित ४० लाख रुपये न देता फसवणूक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठणार! प्रति तोळा २ लाखांच्या पार जाणार? वाचा

Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा वयाच्या ३१ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Russian model viral video: जवळ आला, हात लावण्याचा प्रयत्न केला आणि...! लगट करणाऱ्याला रशियन महिलेने शिकवला धडा

Messy Braid Hairstyle For Long Hair: लांब केसांवर शोभून दिसेल 'मेसी वेणी', लग्नात तुम्हीच दिसाल सुंदर

Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT