Mumbai Crime: ४ वर्षाच्या मुलासोबत आईनं गळफास घेत संपवलं जीवन; हत्येचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू

Woman Killed Herself With 4 Year Boy: कांदिवलीमध्ये एका महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केलीय. परंतु हा घातपात असावा असा संशय पोलिसांना येत आहे. त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केलाय.
Mumbai Crime
Woman Killed Herself With 4 Year Boy:yandex
Published On

मुंबईच्या कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका ३४ वर्षीय महिलेने आपल्या ४ वर्षाच्या मुलासोबत गळफास घेत जीवन संपवलंय. एका आईने आपल्या लेकरासोबत आत्महत्या का केली असावी असा सवाल करत अनेकांना घातपाताचा संशय येत आहे. दरम्यान पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवलंय.

कांदिवली पूर्वमधील समता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलीय. येथील हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत गळफास घेत आत्महत्या केलीय. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लटकलेल्या माय लेकराच्या मृतदेहाला खाली उतरवलं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलेत.

पु्ष्पा दत्त वय ३४ असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी एडीआर दाखल करत हत्या आहे की आत्महत्या या अँगलने तपास केला जात आहे. परंतु पोलिसांसह स्थानिकांना घातपाताचा संशय येत आहे. एक ३४ वर्षीय आई आपल्या ४ वर्षाच्या मुलासोबत आत्महत्या का करेल असा सवाल करत घातपाताचा संशय व्यक्त केलाय.

१४ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

दरम्यान, आज दुपारी एका १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना पंढरपूरच्या माढ्यात घडली. माढा तालुक्यातील आढेगाव या गावात १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. मृत मुलाचे वडील सशस्त्र सीमा बलामध्ये कार्यरत आहेत. वडिलांची रिव्हॉल्व्हर चालवून मुलाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव श्रीधर गणेश नष्टे असे आहे. त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंस्टेस्टर म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com