Crime News  Saam Tv
क्राईम

Crime: कारमधून सोबत गेले, तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं; आर्मीत असलेल्या जावयाचा सासूवर बलात्कार

Greater Noida Crime: ग्रेटर नोएडामध्ये जावयाने सासूवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी आर्मीमध्ये जवान आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. ग्रेटर नोएडामध्ये जावयाने आपल्या विधवा सासूवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने सासूसोबतचे अश्लिल व्हिडीओ देखील काढले. आरोपी जावई हा लष्करामध्ये जवान आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रेटर नोएडामधील राबुपुरामध्ये घडली. पीडित विधवा महिलेने आपल्या जावयाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये पीडितेने सांगितले की, एप्रिल महिन्यामध्ये ती जावयासोबत कारमधून दिल्लीला जात होती. त्यावेळी वाटेमध्ये जावयाने तब्येत बिघडल्याचा बहाणा करून कार हॉटेलमध्ये नेली. हॉटेलमध्ये त्याने एक खोली बुक केली आणि तिथे दोघे जण थांबले. यावेळी जावयाने तिला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिक्स करून दिले. हे पेय प्यायल्यानंतर ते बेशुद्ध पडली.

बेशुद्धावस्थेत जावयाने या महिलेवर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे अश्लिल व्हिडीओ देखील काढले. शुद्धीवर आल्यानंतर तिने जावयाला विरोध केला तर त्याने तिला व्हिडीओ दाखवत धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही. या घटनेनंतर जावयाने या प्रायव्हेट व्हिडीओद्वारे अनेकदा धमकी देत तिच्या बलात्कार केला. त्याने तिच्या मालमत्तेचे कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली.

आपल्या मुलीचे वैवाहिक जीवन खराब होऊ नये यामुळे पीडित महिला गप्प राहिला. जावयाच्या त्रासाला कंटाळून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी जावयाच्या या सर्व त्रासाला कंटाळून तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

SCROLL FOR NEXT