Pune Shocking News  Saam tv
क्राईम

Pune Shocking News : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा संशयास्पद मृत्यू; पुण्यातील खळबळजनक घटना

salil ankola mother found dead : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईची संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटूच्या आईचा राहत्या घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील राहत्या घरी सलील याच्या आईचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रभात रोडवर असलेल्या राहत्या घरात त्यांचा मृत्यू झाला आहे. माला अशोक अंकोला असे माजी क्रिकेटपटूच्या आईचे नाव आहे.

माला अंकोला या माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आई असून त्यांचे वय ७७ होते. माला यांना पूना रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अभिनेता सलील याच्या आईचा पुण्यातील प्रभात रस्त्यावरील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माला अशोक अंकोला यांच्या गळा चिरण्यात आलेला आहे. त्यामुळे हा खून आहे, घातपात आहे किंवा इतर काही याचा तपास पोलीस करत आहेत.

माला यांच्या गळ्यावर होत्या जखमा

आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरात काम करणारी बाई आली होती. तिने बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या मुलीला फोन केला. त्यानंतर मुलीने वडिलांना याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांचे पती घरी आले. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी माला अंकोला या रक्त्याच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची जखम होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र सध्या मृतदेह विश्वविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये ठाकरे गटाचं शिदोरी आंदोलन

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

SCROLL FOR NEXT