Triple Talaq Google
क्राईम

Crime News: महाड येथे तीन तलाकविरोधात पहिला गुन्हा दाखल, पतीसह सासरच्यांवर पोलिसांची कारवाई

Raigad MIDC Police Station: रायगडच्या महाड MIDC पोलिस ठाण्यात तीन तलाक प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीला बेकायदा तलाक दिल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Dhanshri Shintre

रायगड जिल्ह्यातील महाड MIDC पोलिस ठाण्यात तीन तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा घटस्फोट दिल्याच्या या प्रकरणात पतीसह सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि कोकण परिसरात अशा स्वरुपाचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे सांगण्यात येत आहे.

अब्दुल रहेमान इसाने असे आरोपी पतीचे नाव असून, पीडित महिलेचा विवाह 2022 मध्ये अब्दुल सोबत झाला होता. विवाहानंतर अब्दुल कामानिमित्त परदेशात गेला. दरम्यान, त्याच्या आई-वडिलांनी पीडितेकडून एक कोटी रुपये आणि बिरवाडी शहरातील वडिलांचा फ्लॅट व्यवसायासाठी मागितला.

मात्र, तिने यास नकार दिल्यानंतर सासू-सासऱ्यांनी तिला शारीरिक आणि मानसिक छळ दिला. तिच्यावर वारंवार दबाव टाकून, मारहाण करून तिच्या दागिन्यांवरही कब्जा करण्यात आला. त्यानंतर तिला जबरदस्तीने घराबाहेर काढण्यात आले. परदेशात असलेल्या अब्दुलला याविषयी माहिती देण्यात आली.

घरी परतल्यानंतर त्याने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता पत्नीला तीन वेळा तलाक बोलून नातेसंबंध तोडल्याची घटना घडली. देशात तीन तलाकवर बंदी असूनही अशा प्रकारे बेकायदा तलाक दिल्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलिस ठाण्यात सखोल तपास सुरू असून, संबंधित नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT