क्राईम

Baba Siddiqui Firing: मुलाच्या कार्यालयाबाहेरच मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या, असा घडला बाबा सिद्धिकींवरील गोळीबारचा थरार

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या दोन्ही आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. निर्मल नगर पोलिसांनी या दोन आरोपांनी ताब्यात घेतलंय. बाबा सिद्धिकी हे आमदार झिशान सिद्धिकी यांचे वडील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आठवड्याभरात अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाल्याची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे बाब सिद्धिकी यांना राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा होती तरी त्यांच्यावर गोळीबार झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धिकी यांना काही दिवसापूर्वी जिवे धमकी मिळाली होती. एसआरए प्रकल्पाच्या वादातून बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळबार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यलयातून निघत असताना तीन जण तोंडावर रुमाल बांधून आले होते. त्यांनी तीन राऊंड फायर केले आणि फरार झाले होते.आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कशी घडली घटना

टीव्ही नाईनने दिलेल्या वृत्तानुसार, बाबा सिद्धिकी ९.१५ मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या कार्यालयाजवळ फटाके फोडले जात होते. त्याचवेळी गोळीबार झाल्याची माहिती आहे. फटाके फोडले जात असताना तीनजण एका गाडीतून उतरले. त्यांनी तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यात बाबा सिद्धिकी यांच्या सहकाऱ्याच्या पायाला एक गोळी लागली. बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीला गोळी लागली होती. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddique Accuse EXCLUSIVE: बाबा सिद्दिकींवर गोळी झाडणारा हाच 'तो' आरोपी; पाहा व्हिडिओ

Baba Siddique Death : घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावे, महायुती सरकारवर शरद पवार संतापले

Who is Baba Siddique: नगरसेवक ते मंत्री.. मुंबईमधील बाहुबली नेता, बॉलिवूडमध्येही दबदबा; कोण होते बाबा सिद्दीकी?

CM Eknath Shinde : बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ

SCROLL FOR NEXT