fighting between youths rajan hedkar passed away in ulhasnagar  Saam Digital
क्राईम

Ulhasnagar Crime News : पूर्व वैमन्यस्यातून म्हारळ गावात गोळी झाडून युवकाची हत्या

या घटनेतील संशयितांचा पाेलिस तपास करीत आहेत.

अजय दुधाणे

Ulhasnagar News :

उल्हासनगर जवळील म्हारळ गावात एका तरुणाची रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली मध्यरात्री घडली. म्हारळ गावातील खदाणी जवळ ही घटना घडली. या घटनेत राजन हेडकर उर्फ जानू या मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेतील संशयितांचा पाेलिस तपास करीत आहेत. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी राजन हेडकर आणि त्याचे तीन साथीदार म्हारळ गावातील खदाणीत बसले हाेते. अचानक त्या चौघांच्या समोर वीस ते पंचवीस युवक आले. त्यात एकाने दोन गोळ्या हवेत झाडल्या.

तसेच राजनच्या छातीवर एक गोळी झाडली. त्यामुळे राजन जमिनीवर कोसळला. त्यानंतर घटनास्थळावरुन हल्लेखोर पळून गेले. जखमी राजनला त्याच्या मित्रांनी गाडीवर बसवुन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेले. राजनाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेने मारल परिसरात खळबळ माजली आहे. पूर्व वैमन्यस्यातून हत्या झाल्याचे बोलले जात असून टिटवाळा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT