Mandhardevi : भाविकांनाे! मांढरदेव गडावर निघालात? थांबा... काळूबाईचे मंदिर पाच दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

शाकंभरी पौर्णिमे दिवशी मांढरदेवीची मुख्य यात्रा असते.
Mandhardevi Temple
Mandhardevi Templesaam tv
Published On

Satara News :

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई (wai) तालुक्यातील मांढरदेव गडावरील (Mandhardev gad) येथील काळुबाई देवीचे (kalubai temple) मंदिर उद्यापासून (रविवार) 11 जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र मांढरदेव देवस्थान समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Maharashtra News)

मांढरदेव गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे परगावहून येणा-या तसेच परिसरातील भाविकांची वाहने डाेंगरावर जाऊ शकत नाहीत. वेळप्रसंगी भाविकांना पायपीट करावी लागू नये यासाठी मांढरदेव देवस्थान समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Mandhardevi Temple
Udayanraje Bhosale: छत्रपती शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने PM नरेंद्र मोदींनीच आचरणात आणले : उदयनराजे भोसले

शाकंभरी पौर्णिमे दिवशी मांढरदेवीची मुख्य यात्रा असते. या काळात भाविकांची गडावर माेठी गर्दी असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गड आणि परिसरात विकासकामे सुरु आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान रस्त्याच्या कामामुळे मांढरदेव देवस्थान समितीने दिेलेल्या पत्रकात श्री काळेश्वरी देवीचे मंदिर उद्यापासून (ता. सात) येत्या 11 जानेवारीपर्यंत बंद राहणार असून भाविकांनी त्याची नाेंद घ्यावी असे म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Mandhardevi Temple
Kolhapur News : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला, विद्यार्थ्यांचे शिराेलीत स्थलांतर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com