fight between two groups in bhosa near yavatmal  saam tv
क्राईम

Yavatmal Crime News : भोसा परिसरात वाळू घाटावर गोळीबार, 25 जणांवर गुन्हा दाखल; चाैघांना अटक

या घटनेनंतर सहा तासापासून पोलिस घटनास्थळी आहेत. पाेलिसांचा कसून तपास सुरु आहे. आचारसंहिता काळात रिव्हॉल्व्हर आल्या कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal :

यवतमाळ जिल्ह्यातील भोसा परिसरातील वाळू घाटावर एका गटाने दुस-या गटावर गोळीबार केल्याची घटना मध्यरात्री घडली. वाळू तस्करांकडून गाेळीबार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत काेणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर यवतमाळ पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी : पैनगंगा नदीपात्रा रस्त्याच्या कारणांवरून एका गटाने दुसऱ्या गटावर गाेळीबार केला. या गाेळीबारच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संपुर्ण परिसर रात्रभर तणावग्रस्त हाेता.

दरम्यान या घटनेबाबत कृष्णा ढाले यांनी पाेलिसांत तक्रार दिली. ढाले यांच्या तक्रारीनूसार महागांव पोलिसांनी 25 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेतील चार संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाेलिसांनी घटनास्थळावरून चार रिकामे काडतूस आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT