excise officer held for taking bribe worth rs 3 25 lakh in nagpur  Saam tv
क्राईम

Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

ACB Trap On Excise Inspector : एसीबीने तक्रारदाराच्या तक्रारीची शहनिशा केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचत संबंधित अधिका-याला लाच घेताना नागपूर येथील ट्रॅफिक पार्क जवळ पकडले.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

बिअर बार सुरू करण्यासाठी एफएल 3 परवाना हवा असल्यास लाखाे रुपयांची लाच मागितल्याची तक्रार नागपूरमध्ये एसीबीकडे दाखल झाली हाेती. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत सव्वातीन लाख रुपयांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक केली. रवींद्र कोकरे असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती एसीबी कार्यालयातून मिळाली. (Maharashtra News)

राज्य उत्पादन शुल्क विभागात बिअर बारच्या परवान्यासाठी इच्छुक अर्ज करतात. त्याचा परवाना मिळावा यासाठी या कार्यालयातून दिरंगाई हाेत असते असा आराेप अर्जदार करतात. या कार्यालयातून एका अधिका-याने अर्जदाराला परवान्यासाठी लाच मागितल्याचा आराेप करीत त्याने एसीबीकडे धाव घेतली.

एसीबीने तक्रारदाराच्या तक्रारीची शहनिशा केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचत संबंधित अधिका-याला लाच घेताना नागपूर येथील ट्रॅफिक पार्क जवळ पकडले. रवींद्र कोकरे असे त्याचे नाव असून त्यास अटक केली असून त्यापूर्वी त्याच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT