killer soup saam tv
क्राईम

बदला घेण्यासाठी बॉयफ्रेंडला दिलं 'किलर सूप'; सनकी गर्लफ्रेंडने ५ जणांना संपवलं

Ex-boyfriend Revenge: एका मुलीने एक बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी त्याच्या सूपमध्ये विष मिसळलं. हे 'किलर सूप' प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं ब्रेकअप किंवा पॅचअप अशा अनेक गोष्टी घडत असतात. अनेकदा एखादा जोडीदार बदला घेण्यासाठीही पुढे-मागे बघत नाही. नुकतंच अशीच एक घटना समोर आलीये. एका मुलीने एक बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी त्याच्या सूपमध्ये विष मिसळलं. हे 'किलर सूप' प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नायजेरियाची आहे.

नायजेरियातील एडोमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेमध्ये तरुणीला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

बदला घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर

नायजेरियातून बदला घेतल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. या ठिकाणी एका मुलीने असा कट रचला की ऐकून कोणीही थक्क होईल. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एकाच कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह एका बंद खोलीत आढळले. घरातील सदस्य बाहेर कुठेतरी गेले होते. त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरात कोणीही दिसलं नाही. तपास केल्यानंतर असता एका खोलीत हे भयानक दृश्य डोळ्यांना दिसलं.

ही संपूर्ण घटना एका मुलीच्या बदल्याची आहे. या मुलीला माजी प्रियकराचा बदला घ्यायचा होता. जेव्हा मुलीने एक्स बॉयफ्रेंडवर नाराजी व्यक्त करत पारंपारिक सूपमध्ये विष मिसळले. यामध्ये विषारी सूप पिऊन पाच जणांना जीव गमवावा लागलाय.

या मुलीचा हेतू केवळ तिच्या एक्स बॉयफ्रेंडला मारण्याचा होता. परंतु यामध्ये अजून चार जणांना आपला जीव गमवावा लागला. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये त्याचा भावाचा समावेश होता. शिवाय उर्वरित तीन त्यांचे मित्र होते.

स्थानिक पोलिसांनी मुलीला अटक केल्याची पुष्टी केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. इडो राज्य पोलीस कमांडचे प्रवक्ते, मुसा यामू यांच्या सांगण्यानुसार, आमचे अधिकारी मृत्यू कसा झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. ते अद्याप मृत्यूचं नेमकं कारण शोधतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT