Kalyan Crime News Saam Tv
क्राईम

Crime Alert : हाय प्रोफाइल सोसायटीत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : कल्याण पूर्वेतील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये तरुणांनी डॉमिनोज डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण पूर्वेतील हाय प्रोफाइल सोसायटीत डॉमिनोज डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण

  • आरोपी तिघेही दारूच्या नशेत असल्याचं उघड

  • सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे

  • परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याण पूर्वेतील हाय प्रोफाईल ‘रितेश अंपायर सोसायटी’मध्ये काल रात्री धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या तिघा तरुणांनी एका डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश अंपायर सोसायटीमध्ये तीन तरुण नेहमी डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या बॉयना मुद्दाम अडवून त्रास देत असतात. काल रात्री देखील त्यांनी रितेश अंपायर सोसायटीमध्ये डॉमिनोज मधून पिझ्झाची ऑर्डर घेऊन एक डिलिव्हरी बॉय आला होता. दरम्यान सोसायटीत असलेल्या या तिघांनी मिळून किरकोळ कारणावरून वाद घातला.

वादातून या तिघांनी अचानक डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. धक्कदायक म्हणजे हे तिघेही दारूच्या नशेत असल्याचं उघडकीस आलं आहे. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेनंतर डिलिव्हरी बॉयने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपींविरुद्ध पुढील कारवाई करत आहेत. मात्र या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनीही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान वारंवार होणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर हिंस्त्रक वागणुकीमुळे नव्या वादाला वळण फुटणार का ? तसेच दहशत पसरवणाऱ्या या तिघांना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT