Bhandara News Saam Tv
क्राईम

Shocking News : आईशी सतत भांडतो, संतापलेल्या तरुणाने धाकट्या भावाला संपवलं; भंडाऱ्यात खळबळ

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये घरगुती वादातून धाकट्या भावाने मद्यधुंद अवस्थेतील मोठ्या भावाची मित्राच्या मदतीने हत्या केली. पोलिस तपासात नैसर्गिक मृत्यूच्या बनावामागील हत्या उघड झाली असून आरोपींना अटक झाली आहे.

Alisha Khedekar

  • भंडाऱ्यातील तुमसर येथे घरगुती वादातून मोठ्या भावाची हत्या.

  • मद्यधुंद अवस्थेत सतत आईशी भांडण करणारा भाऊ ठरला बळी.

  • धाकट्या भावाने मित्राच्या मदतीने विटांनी वार करून खून केला.

  • पोलिसांनी सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू मानलेल्या प्रकरणाचा तपास करून खुनाचा उलगडा केला.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात घरगुती वादातून धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आईशी वारंवार भांडण करणाऱ्या मोठ्या भावावर धाकट्या भावाने रागाच्या भरात प्राणघातक हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या एका मित्राच्या मदतीने केली गेली असून, सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची सखोल दिशा घेत, या मृत्यूमागील क्रूर सत्य उघडकीस आणले.

तुमसर शहरातील आंबाटोली परिसरात राहणारा ३५ वर्षीय रोशन प्रकाश वासनिक हा काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत सतत आईशी वाद घालत होता. या वादामुळे घरात तणावाचं वातावरण तयार झालं होतं. या पार्श्वभूमीवर रोशनचा धाकटा भाऊ राकेश प्रकाश वासनिक याने आपल्या मित्र किरण उर्फ लारा मारबते याच्यासोबत मिळून हा अत्यंत गंभीर निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास, राकेशने रोशनला घराबाहेर बोलावून घेतले आणि अचानक त्याच्यावर विटांनी वार केले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रोशनने प्रतिकारही करू शकला नाही. या हल्ल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी राकेश आणि किरण यांनी रोशनचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेहावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीचे स्पष्ट पुरावे समोर आल्यावर तपास अधिकच खोलवर करण्यात आला. पोलिसांनी शंका घेऊन राकेश आणि किरण यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

घरगुती वाद म्हणून दुर्लक्षित झालेली ही घटना खुनात परिवर्तित झाली असून, आरोपींनी केवळ वैयक्तिक संतापातून मोठ्या भावाचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नात्यांतील कटुता किती टोकाला जाऊ शकते, याचं हे एक भीषण उदाहरण ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Param Sundari: साऊथ आणि नॉर्थची लव्हस्टोरी...; सिद्धार्थ- जान्हवीचा 'परम सुंदरी' ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Manoj jarange patil protest live updates : अमित ठाकरेंचा आज पुणे दौरा, मानाच्या गणपतीचं घेणार दर्शन

Yavatmal : तलठ्याची शेतकऱ्यांशी अरेरावी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अतिवृष्टीच्या यादीवरून वाद

Pitru Paksha 2025: गर्भात मृत पावलेल्या बाळाचं श्राद्ध केलं पाहिजे का? वाचा शास्त्र काय सांगतं?

Afghanistan Earthquake: जमिनीला भेगा, घरं कोसळली; मदतीसाठी आरडाओरडा, मृतदेहांचा खच; अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे ६२२ बळी

SCROLL FOR NEXT