Mumbai Gold Smuggling News Saam Tv
क्राईम

Gold Smuggling: डीआरआयची मोठी कारवाई! सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश, १६ किलो सोने केले जप्त

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Gold Smuggling News:

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री होत असल्याची माहिती डीआरआयला गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत, तस्करी करून आणलेल्या सोन्याची खरेदी विक्री करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जागेची 5 मार्च 2024 रोजी तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना तेथे परदेशी बनावटीचे मुख्यतः विटांच्या स्वरूपातील 10.7 किलो सोने, तसेच सोने तस्करीच्या विक्री व्यवहारांतून मिळवलेली 1.8 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आणि त्यांनी ती ताब्यात घेतली.

धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेतले आणि यापैकी एक जण ही टोळी चालवत असल्याचे निदर्शनास येताच त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत तस्करी करून आणलेले 3.77 किलो सोने ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या अधिक माहितीवरुन, 5 मार्च 2024 रोजी टोळीच्या प्रमुखाच्या घरी शोधमोहीम राबवण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले. पथकातील अधिकाऱ्यांना पाहून त्या माणसाने 14 व्या मजल्यावरील त्याच्या निवासस्थानातून संशयास्पद वस्तू फेकून देण्यात यश मिळवले. या परिसरातून 60 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकशीदरम्यान, टोळीच्या प्रमुखाने सांगितले की त्याने त्याचे फोन आणि परदेशी बनावटीच्या सोन्याच्या दोन विटा फेकून दिल्या. सुमारे 15 तासांची शोधमोहीम आणि पाठपुरावा केल्यानंतर 6 मार्च 2024 रोजी प्रमुखाच्या सोसायटीला लागून असलेल्या दोन सोसायट्यांमधील दोन रहिवाशांकडून टोळी प्रमुखाच्या मालकीचे 3 मोबाईल फोन आणि प्रत्येकी 1 किलो वजनाच्या 2 सोन्याच्या विटा ताब्यात घेण्यात आल्या. या रहिवाशांना तपासणीच्या रात्री योगायोगाने या वस्तू मिळाल्या होत्या आणि त्यांनी त्या स्वतःजवळच ठेवल्या होत्या.  (Latest Marathi News)

या प्रमुखाची पत्नीदेखील या टोळीची सक्रीय सदस्य आहे आणि ती कारमधून पळून जात आहे. ही माहिती मिळाल्यावर, 6 मार्च 2024 रोजी पहाटे तिला अडवण्यासाठी पथक तैनात करण्यात आले. सुमारे 6 तासांच्या पाठलागानंतर तिला पकडल्यावर सोने विक्री व्यवहारांतून मिळालेली चांदी आणि रोख रक्कम ठेवलेली तिजोरी तिच्या फार्महाऊसवर असलेल्या तिच्या मदतनीसाच्या घरी ठेवल्याची माहिती तिने दिली. त्या मदतनीसाच्या घरी धाड घातल्यावर तेथून 6 किलो सोने आणि 25 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणी तस्करी केलेले 10.48 कोटी रुपयांचे एकूण 16.47 किलो, तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेली चांदी आणि 2.65 कोटी रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली तसेच टोळीच्या प्रमुखासह एकूण 6 व्यक्तींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT