Phaltan Doctor Fraud Saam Tv
क्राईम

Doctor Fraud Exposed : डॉक्टरांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा वापर, विमा कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपयांना गंडा घातला

Phaltan Doctor Fraud : फलटण तालुक्यात बनावट सही आणि नोंदणी क्रमांक वापरून विमा कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. डॉ. ब्रह्मानंद टाले यांच्या नावाने बनावट रक्त तपासणी अहवाल तयार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • फलटणमध्ये बनावट सही आणि नोंदणी क्रमांक वापरून फसवणूक उघड.

  • विमा कंपन्यांची लाखो रुपयांची दिशाभूल झाल्याचा प्रकार.

  • चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल.

  • वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण.

फलटण तालुक्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. ब्रह्मानंद टाले यांच्या बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा वापर करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप चौघांविरुद्ध झाला आहे. विमा कंपनीला दिशाभूल करून बनावट रक्त तपासणीचे अहवाल देत हे भामटे पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला असून, रुग्णांचा विश्वासघात केल्याचा आरोप संबंधितांवर ठेवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी "बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स" कंपनीचे प्रतिनिधी खामगाव येथे आले होते. त्यांनी डॉ. ब्रह्मानंद टाले यांना काही रक्त तपासणीचे अहवाल दाखवले आणि हे अहवाल तुम्ही प्रमाणित केले आहेत का, असा प्रश्न विचारला. मात्र अहवाल पाहताच डॉ. टाले यांना धक्का बसला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हे अहवाल त्यांनी प्रमाणित केलेले नाहीत, तसेच या अहवालांवर त्यांची बनावट स्वाक्षरी व खोटा नोंदणी क्रमांक वापरण्यात आला आहे.

यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, या खोट्या अहवालांवर डॉ. टाले यांच्या धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे नाव वापरण्यात आले होते. त्यामुळे या बनावट प्रकारामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला. या प्रकरणी डॉ. टाले यांनी तत्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीतून समोर आले की, फलटणचे डॉ. बी. जे. राऊत, धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडीचे चालक विशाल एम. नाळे, श्रीराम हेल्थ केअर सर्व्हिसेस लॅबोरेटरी इंदापूरचे चालक शंकर खडसे आणि प्रतिभा सोळुंके यांनी हा बनावट कारभार केला आहे.

फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ४२०, ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, बनावट सही, बनावट नोंदणी क्रमांक वापरून हे लोक रक्ताचे खोटे अहवाल तयार करत होते आणि विमा कंपन्यांना सादर करून लाखो रुपयांची फसवणूक करत होते.

या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, रुग्णांचा विश्वासघात करणाऱ्या अशा घटनांमुळे विमा कंपन्याही सावध झाल्या आहेत. डॉक्टरांची ओळख आणि नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करणे हा केवळ गुन्हाच नाही तर रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका पोहोचवणारा प्रकार आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणातील मूळ सूत्रधार कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या घटनेनंतर सामान्य रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: १० टक्के की OBC, मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

Maharashtra Live News Update: लातूरच्या वांगदरी गावात ग्रामस्थांच साखळी उपोषण सुरू

Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये, पाहा डोळे दिपवणारे फोटो

Swelling Issues : सकाळी हात पाय सुन्न पडतात? कारणं आणि उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT