Dhule Sakri Crime Saam tv
क्राईम

Sakri Crime: धक्कादायक..सशस्त्र दरोडा टाकत तरुणीचेही केले अपहरण

Dhule News : दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. मात्र घरात असलेल्या तरुणीने झटापट केली असता, त्यांनी हाताने तोंड दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्रांचा धाक

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वतीनगर येथे रात्री अकराच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी २३ वर्षीय तरुणीचे (Dhule) अपहरण केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत दरोडेखोरांचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेबाबत ज्योत्स्ना नीलेश पाटील यांच्या (Crime News) फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

साक्री तालुक्यातील दहिवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योत्स्ना पाटील यांच्या घरी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास चार ते पाच अज्ञात घरात शिरले. ज्योत्स्ना पाटील यांचे पती नीलेश पाटील कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत साक्रीतच राहणारी त्यांची भाचीला सोबत बोलावले होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. मात्र घरात असलेल्या तरुणीने झटापट केली असता, त्यांनी हाताने तोंड दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्रांचा धाक दाखवीला. यानंतर कानातील सोन्याचे काप, पट्टीची माळ, मणी- मंगळसूत्र, अंगठी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण असे एकूण ८८ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचे ज्योत्स्ना पाटील यांनी (Police) पोलिसांनी सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला

घरातील सदरचा ऐवज हिसकावल्यानंतर हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबला यानंतर मागील रूममध्ये लोटले व भाची निशा शेवाळे हिला घेऊन पळून गेले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर काही वेळानंतर ज्योत्स्ना पाटील यांनी कसेबसे हात सोडवून खिडकीची काच उघडत आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरवात केली. यानंतर श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांना रात्रीच बोलावून नमुने घेण्यात आले व शहरातून बाहेर पडणाऱ्या आजूबाजूला सर्व रस्त्यांनी दरोडेखोराचा शोध सुरू करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT