Dhule News Saam Digital
क्राईम

Dhule News : धुळ्यात १४ वर्षांच्या मुलासोबत किळवाणं कृत्य! मस्करी करता करता गेला जीव, दोघांवर गुन्हा दाखल

Dhule Crime News : टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणं दोघांना चांगलंच महाग पडलं आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने या 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

भूषण अहिरे

टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणं दोघांना चांगलंच महाग पडलं आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने या 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. लळींग शिवारातील पंचरच्या दुकानात ही घटना घडली, याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईक मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब वय 14 वर्ष हा देखील काम करत होता. त्यांच्या दुकानाशेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात.

शेजारीच दुकान असल्याने खालीक हा त्यांना चांगला ओळखत होता. सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचं दुकान उघडं होतं. मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे खालीक हा दुकानात एकटा होता. यावेळी शिवाजी सुळे व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली.

मोहम्मद खालीकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होवू लागला. त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी खालिकला आयसीयुमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी आतड्यांना व नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचं सांगितलं. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कांदा चिरताना तुमचे डोळे पाणावतात ? मग फॉलो करा या सिक्रेट टिप्स

Liver Detox Tips: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लवंगाचे पाणी ठरेल बेस्ट, तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स

Narayana Murthy: चीनचा ९-९-६ फॉर्म्युला वापरा, आठवड्यात किती तास काम करावे?नारायण मूर्तींनी पुन्हा दिला सल्ला

दोघेही रंगाने सावळे, मग मुल गोरं कसं झालं? नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय, बायकोला झोपेतच संपवलं

Mumbai Crime: मुंबईत बिल्डरवर धाडधाड गोळ्या झाडल्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT