Dhule Crime News Saam TV
क्राईम

Dhule Crime News: धुळ्यात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; पोलिसांकडून टोळक्याचा पर्दाफाश, ५ जणांना अटक

Dhule Crime: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली असून चोरीला गेलेल्या जवळपास 12 मोटरसायकली ताब्यात घेतल्यात. ही वाहने जिल्ह्यासह जिल्हा बाहेरून चोरली असल्याचे उघडकीस आले आहे.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

Dhule News:

धुळ्यातील (Dhule) चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला असून चोरीला गेलेल्या जवळपास 12 मोटरसायकली ताब्यात घेतल्यात. तसेच या घटनेत पाच जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत.

शहरात सतत दुचाकी (Two Wheeler) चोरीच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात मोठी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला असता या कारवाईदरम्यान जवळपास पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 12 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यातील सहा दुचाकी वाहने हे विविध गुन्ह्यांमध्ये असल्याचे आढळून आले आलेय.

तर इतर ६ वाहने कुठली आहेत त्याचा देखील पुढील तपास पोलीस करत आहे. ही वाहने जिल्ह्यासह जिल्हा बाहेरून चोरली असल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या फटाका अग्नीकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

UTI vs Diabetes : वारंवार लघवीला जावे लागतेय? युरिन इन्फेक्शन की डायबिटीज, कसे ओळखाल?

Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT