Dhule News Saam tv
क्राईम

Dhule Crime News: घरात राहण्यावरून बाप अन् पोरामध्ये बिनसलं; झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात घातला दांडुका

Shirpur News: एका ३० वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा खून केलाय. ही घटना शिरपूरमधील बारोडी गावात घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भुषण अहिरे , साम प्रतिनिधी

घरं, परिवार म्हटलं की वाद-विवाद होत असतात. लहान-मोठ्या गोष्टींवरून नवरा-बायको, आई-वडील, पालक आणि मुलांमध्ये वाद होत असतात. परंतु या वादाचे रुपांतर कधी-कधी मोठ्या गुन्ह्यात होते. अनेकवेळा विभक्त राहण्यावरून किंवा एकत्र राहण्यावरून परिवारातील सदस्यांमध्ये खटके उडत असतात. या वादांचे मोठ्या भांडणात रुपांतर होत असते. शिरपूरमध्येही अशीच घटना घडलीय.

येथील पावरा कुटुंबातही वडील आणि मुलाचं एकत्र राहण्यावरून वाद झाला. या वादातून मुलगा गुन्हेगार झाला अन् जन्मदात्याचा मारेकरी बनला. अंगाचा थरकाप उडवणारा हा गुन्हा शिरपूर तालुक्यातील बारोडी गावात घडला. येथे सिंगा तुमड्डू पावरा (वय ७०) हे आपला मुलगा सुनिल सिंगा पावरा याच्यासोबत राहात होते. परंतु वडील सिंगा पावरा आपल्यासोबत राहू नये, असं मुलगा सुनिलला वाटत होतं. त्यावरून तो वडिलांसोबत भांडण करत होता.

नेहमी चिडचीड करत असायचा. वडिलांनी आपल्या घरात राहू नये, यावरून सुनिल आणि वडील सिंगा यांच्यात दोन दिवसांपासून वाद होत होता. कालच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाल्यानंतर सुनिल पावरा घराबाहेर निघून गेला. रात्री परत घरी आल्यानंतर त्याने रागाच्या भरात आपल्या वडिलांचा खून केला.

आरोपी सुनिल घरी आला होता तेव्हा त्याचे वडील गाढ झोपेत होते. त्यावेळी सुनिलच्या मनात राग आला. रागाने त्यांच्या मनावर आणि त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर रागाने पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. त्या रागाच्या भरात त्याने घरात असलेला दांडुका झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात घातला. यामध्ये वृद्ध वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धाला परिवारातील सदस्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मारेकरी मुलाच्या शिरपूर तालुका पोलिसांनी मूसक्या आवळल्या असून, त्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

57 वर्षाच्या महिलेचं राक्षसी कृत्य,जोडीदाराला जिवंत जाळलं

सुदेशना जेना असं आरोपी महिलेचं नाव आहे. तर मृत घर मालकाचे नाव हरिहर साहू असं आहे. हरिहर साहू याची संपत्ती हडपण्यासाठी महिलेनं 72 वर्षीय जोडीदाराची हत्या केलीय. ही घटना ओडिसामध्ये घडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

Tractor Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरच्या किंमती ६० हजारांनी कमी होणार, घटस्थापनेपासून नवे दर

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

SCROLL FOR NEXT