Dharashiv Youth Attacked at Saloon Shop Saam Tv News
क्राईम

Dharashiv Crime : 'दाढी-कटिंग उधार कर, पैसे नाहीत'; नकार दिल्यानं राग अनावर, हातातील कड्यानं डोक्यावर वार; VIDEO

Dharashiv Youth Attacked at Saloon Shop : हल्लेखोराची जखमी तरुणासोबतची बाचाबाची आणि हाणामारी दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ऋतुराज मोरे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

Prashant Patil

धाराशिव : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. उधार दाढी कटिंग न केल्याने दुकानात काम करणाऱ्या तरुणावर सलून दुकानातच धारधार शस्त्राने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हल्ला झालेला तरुण जखमी झाला आहे. धाराशिव शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील न्यू क्लासिक जेंट्स पार्लर येथे ही घटना घडली आहे.

हल्लेखोराची जखमी तरुणासोबतची बाचाबाची आणि हाणामारी दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ऋतुराज मोरे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने 'दाढी आणि कटिंग उधार कर, पैसे नाहीत', असं सांगितलं. मात्र, दुकानातील तरुण कर्मचाऱ्यानं उधार सेवा नाकारल्यानं हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT