Delhi Crime News Saam Tv
क्राईम

Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

Delhi Police: दिल्लीमध्ये १० वर्षांच्या मुलीवर टॅक्सी चालकाने बलात्कार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने तिचा मृतदेह जंगलात नेऊन फेकला.

Priya More
  • दिल्लीमध्ये १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार

  • बलात्कारानंतर आरोपीने मुलीची केली हत्या

  • हत्येनंतर मृतदेह जंगलात नेऊन फेकला

  • पोलिसांनी आरोपी टॅक्सी चालकाला अटक केली

दिल्लीमध्ये १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. दिल्लीच्या महरोलीमध्ये ही घटना घडली. सोमवारी सकाळी १० वर्षांच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे टॅक्सी चालकाने अपरहण केले. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही त्याने तर त्याने तिची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह महरौली येथील जंगलात नेऊन टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीमध्ये घडली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी टॅक्सी चालकाचे नाव बबलू (२५ वर्षे) आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. महरौली पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना आरोपी पीडित मुलीला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या ४ तासांत त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने पीडित मुलीचे सीडीआर चौकातील रस्त्यावरून अपहरण केले होते. त्यानंतर तो तिला गुरूग्रामच्या जंगलात घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. जंगलामध्येच त्याने तिचा मृतदेह फेकून देत फरार झाला. पीडित मुलीचे कुटुंबीय रस्त्यावर झोपायचे.

हत्या करण्यात आलेली मुलगी फुगे विकायची. तिचे आई-वडील मजुरीचे काम करायचे. पीडित मुलीच्या आई-वडिलांना चार मुलं आहेत. ते मूळचे बिहारचे आहेत. ते सर्वजण आधी भाड्याच्या घरात राहत होते पण आता ते रस्त्याच्या कडेला राहत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT