Mumbai Minor Girl Molestation Case Saam TV
क्राईम

Delhi Crime : संतापजनक! स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

Rohini Gudaghe

मुंबई : देशभरात दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना रोज समोर येत आहेत. आता दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या शिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. एका स्वसंरक्षण प्रशिक्षकाने विद्यार्थिनीला अयोग्यरित्या स्पर्श करून धमकावल्याचं समोर आलंय.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

दिल्लीतील सुलतानपुरी भागात शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. शुक्रवारी सुलतानपुरी भागात एका सरकारी शाळेतील एका ११ वर्षीय विद्यार्थीनीचा शिक्षकाने वर्गातच लैंगिक छळ केल्याचं समोर (Delhi Crime News) आलंय. ही व्यक्ती एका स्वयंसेवी संस्थेमार्फत स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देत होती. पिडितेच्या तक्रारीनंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने निदर्शने केल्याचं समोर आलंय.

स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाचं भयंकर कृत्य

दिल्ली सरकारने निवेदनात म्हटलंय की, शिक्षण मंत्री आतिशी यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याचे आदेश (Crime News) दिलेत. तपासानंतर जे निष्कर्ष समोर येतील, त्या आधारे दोषीवर सर्वात कठोर कारवाई केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं निवेदनात म्हटलंय.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज तकला दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबातील सदस्य आणि शेजारी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले होते. त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी (Trainer Molested minor student) केलीय. पीडितेच्या वडिलांच्या दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीने त्यांना दुपारी फोन केला होता. संबंधित शिक्षकाने तिला वर्गात अयोग्यरित्या स्पर्श केला. याविषयी कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. त्यांनी स्थानिक पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला शुक्रवारी दुपारी १२.१२ वाजता शाळेतील शिक्षकाकडून लैंगिक छळ झाल्याची माहिती मिळाली. भारतीय न्याय संहिताच्या कलम ३५१ (गुन्हेगारी धमकी) (self defense class) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) अंतर्गत सुलतानपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलीचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT