CCTV Footage Saam TV
क्राईम

CCTV Footage: भरदिवसा सलूनमध्ये गोळीबार; २ जणांचा मृत्यू, थरारक घटनेनं दिल्ली हादरली

Delhi Firing News: एका सलूनमध्ये तीन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्याता आला. या घटनेमध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. थरारक घटनेनं मुंबईनंतर आता दिल्ली देखील हादरली आहे.

Ruchika Jadhav

Salon cctv footage:

आधी कल्याण मग मुंबईमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये घबराट परसली आहे. मुंबईतील गोळीबाराचा थरार अनेकांनी लाईव्ह पाहिला. त्यानंतर याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता आणखी एक चित्तथरारक गोळीबाराची घटना समोर आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील शुक्रावारी गोळीबार झाला आहे. एका सलूनमध्ये तीन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्याता आलाय. या घटनेमध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. थरारक घटनेनं मुंबईनंतर आता दिल्ली देखील हादरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीतील नजफगडमधील एका सलूनमध्ये ही घटना घडली आहे. सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण सलूनमध्ये अचानक घुसले आहेत. सलूनमध्ये येताच त्यांनी गोंधळ, आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. काही वेळातच तिथे एक व्यक्ती खाली बसलेला दिसत आहे. सलूनमध्ये घुसलेल्या तीन जणांपैकी एकाने या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक धरली आणि गोळीबार केला. एक मुलगी तेथून पळत आपला जीव वाचवण्यासाठी एका खोलीत शिरली आहे.

गोळीबार केल्यानंतर तीन्ही जण तेथून निघून गेले. त्यानंतर आसपासच्या दुकानातील व्यक्तींना त्यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सलूमनधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. सोनू आणि आशिष अशी या दोन मृत तरुणांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT