दिल्लीमध्ये एका महिलेनं नवऱ्याचा खून करण्यासाठी बहिणीच्या दीराला ₹५०,००० ची सुपारी दिली.
या खुनामागे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वर्षभर जुन्या हत्येचा छडा लावला.
पत्नी, प्रियकर आणि आणखी एका नातेवाइकाला पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमधील खूनाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध. अलिकडेच इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडही चर्चेत होते. त्याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक वर्षापूर्वीचा खून प्रकरणाचा उलगडला केलाय.
दिल्लीतील हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि महिलेच्या बहिणीच्या मेहुण्याला अटक केलीय. हा हत्याकांड ५ जुलै २०२४ रोजी घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस एका दुसऱ्या एका गुन्ह्याचा तपास करत होते.दिल्ली पोलीस ट्रकची लुटमार करणारा आरोपी प्रीतम प्रकाशचा शोध घेत होती. प्रीतम गेल्या काही दिवसापासून फरार होता.पोलीस त्याच्या शोधार्थ अलीपूर येथे पोहोचले. पोलीस त्याच्या मोबाईलचा मागोवा घेत तेथे पोहोचले होते.
तेव्हा पोलिसांना रोहित नावाच्या एका मुलाकडे प्रीतमचा मोबाईल आढळून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रीतमची हत्या झाली असल्याचं सांगितलं. प्रीतमच्या हत्येत त्याच्या प्रेयसीचा सहभाग असल्याचंही त्याने सांगितलं. रोहितची प्रेयसीही प्रीतमची बायको आहे. तिचं नाव सोनिया आहे. त्या दोघांनी मिळून प्रीतमची हत्या केली.
या दोघांनी प्रीतमला ५ जुलै २०२४ रोजी सोनपतला नेलं. तेथे सोनियाच्या बहिणीच्या दीराला ५० हजारांची सुपारी देत प्रीतमची हत्या केली. त्यानंतर प्रीतमची हत्या झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह १० जुलैला सोनीपतमधील एका नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांना हा मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख लवकर पटली नव्हती.
दरम्यान प्रीतमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर सोनिया दिल्लीला आली. तिने प्रीतम बेपत्ता झालाय याची तक्रार पोलिसात दाखल केली. तिने प्रीतमचा मोबाईल लपवून ठेवला. मात्र एक वर्षानंतर रोहितने जेव्हा प्रीतमचा फोन वापरणं सुरू केलं तेव्हा पोलिसांना हत्येचा उलगडा झाला.
जुना फरार प्रीतम प्रकाश याच्या शोधात पोलीस अलीपूरला पोहोचले होते. प्रीतमवर ट्रक लुटण्याचे अनेक गुन्हे दाखल होते. बराच काळ फरार असलेल्या प्रीतमचा फोन नुकताच सक्रिय झाला होता. पोलिसांनी तो ट्रेस केला आणि अलीपूरला पोहोचला. प्रीतमचा मोबाईल रोहित नावाच्या तरुणाकडे सापडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.