Maharashtra Politics: रायगडमध्ये शीतयुद्धाचा नवा अध्याय, गोगावलेंचा इशारा, अजित पवारांचा पलटवार

Ajit Pawar reaction To Bharat Gogawale: रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरु असणाऱ्या वादात आता राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत शीतयुद्धाचा नवा अध्याय पाहायला मिळतोय. रायगडमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला देत मंत्री गोगावलेंवर कसा पलटवार केलाय?
Ajit Pawar addressing NCP workers in Raigad, launching a direct attack on Shiv Sena minister Bharat Gogawale over the guardian minister issue.
Ajit Pawar addressing NCP workers in Raigad, launching a direct attack on Shiv Sena minister Bharat Gogawale over the guardian minister issue.Saam Tv
Published On

रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील शीतयुद्धाचा नवा अध्याय सुरु झालाय. रायगडमधील माजी आमदारांच्या मुलांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. पालकमंत्री पदाचा वाद ताजा असतानाच आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वादाला पुन्हा सुरुवात झालीय. शिवसेनेला चेकमेट देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय, अशी चर्चाही सुरु झालीय. मात्र शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही, असा टोला शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी लगावला तर दुसरीकडे 'कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या'... असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत गोगावलेंवर जोरदार पलटवार केलाय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरेंनी रायगडमध्ये शिवसेनेला घेरण्यासाठी कशी रणनिती आखलीय पाहूयात..

'रायगड'मध्ये शीतयुद्धाचा नवा अध्याय

माजी आमदारांच्या मुलांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधकांना घेरण्याची रणनिती

शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

राजीव साबळेंचा श्रीवर्धन मतदारसंघात प्रभाव

स्नेहल जगताप राष्ट्रवादीत आल्यानं गोगावलेंविरोधात तुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण

काँग्रेसचे प्रवीण ठाकूर पक्षात आल्यानं रायगडमध्ये राष्ट्रवादीला बळ

रायगडमधील पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीय. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटकपक्ष एकमेंकाविरोधात फिल्डिंग लावत आहेत. त्यामुळे महायुतीत वार- पलटवारांमुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलचं तापू लागलयं. आता तटकरे आणि गोगावले या वादात खुद्द अजित पवारांनी उडी घेतल्यानं पुढे काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com