Kamal Bhabhi Murder Update News  Saam Tv News
क्राईम

कमल कौर भाभीनंतर 'या' दोघींचे VIDEO पोस्ट, अश्लील व्हिडिओ पोस्ट करतात म्हणणारा 'तो' नेमका कोण?

Kamal Bhabhi Murder Update News : दीपिकाला ज्या ईमेल आणि मोबाइल नंबरवरून धमक्या मिळत आहेत त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी याची पुष्टी केली आहे.

Prashant Patil

अमृतसर : सोशल मीडियावर ‘कमल कौर भाभी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या इन्फ्लुएंसर कांचन कुमारी हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिचा मृतदेह कारमध्ये पार्किंगमध्ये आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.

पंजाबच्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कमल कौर भाभीच्या हत्येनंतर अनेक पंजाबी इन्फ्लुएंसरना धमक्या मिळू लागल्या आहेत. निहंग अमृतपाल सिंग मेहरोनने दोन दिवसांपूर्वी अमृतसरच्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर दीपिका लुथरा हिला व्हिडिओ जारी करून धमकी दिली होती, तर आता तिला ईमेलद्वारेही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

बब्बर खालसा इंटरनॅशनलने या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने धमकी देताना असंही लिहिलं आहे की, 'घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करा.' या धमकीनंतर अमृतसर पोलिसांच्या सायबर सेलने मेहरोनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर दीपिका लुथराच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दीपिकाला ज्या ईमेल आणि मोबाइल नंबरवरून धमक्या मिळत आहेत त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी याची पुष्टी केली आहे. भुल्लर म्हणाले की, 'ई-मेल पाठवणाऱ्याने दीपिका लुथरा अजूनही आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करत असल्याचं म्हटलं आहे, आणि तिला तिच्या घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे.' ई-मेलमध्ये म्हटले आहे की, 'खालसा लोक तिच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि संधी मिळाल्यावर ते तिलाही ठार मारतील.'

प्रीत जट्टीलाही पोलीस संरक्षण मिळणार

त्याच ई-मेलमध्ये तरन तारण जिल्ह्यातील युट्यूबर प्रीत जट्टीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरन तारण जिल्ह्यातील युट्यूबर प्रीत जट्टी उर्फ सिमरनजीत कौर हिने दावा केला आहे की, तिला परदेशी नंबरवरून धमक्या येत आहेत आणि तिच्या जीवाला धोका आहे. सिमरनजीतचे प्रीत जट्टीच्या नावाने एक सोशल मीडिया अकाउंट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT