Mumbai Police News Saam Tv
क्राईम

Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात पोलीसच अडकला, लिंकवर क्लिक केलं अन्....

Mumbai Police News : मुंबईतील पोलिस कॉन्स्टेबल यांची सायबर फसवणुकीतून जवळपास ९० हजार रुपयांची लूट झाली. अज्ञात कॉल आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली असून सामान्य जनता कितपत सुरक्षित असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत बीकेसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सायबर फसवणुकीचे बळी ठरले.

  • अज्ञात व्यक्तीच्या लिंकवर क्लिक करताच खात्यातून जवळपास ९० हजार रुपये वजा झाले.

  • चव्हाण यांनी फसवणूक होताच १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधून गुन्हा नोंदवला.

  • पोलिसांनाच फसवलं जात असल्याने सामान्य जनता किती सुरक्षित हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संजय गडदे, ,मुंबई प्रतिनिधी

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. सरकारकडून तसेच पोलिसांच्या माध्यमातून या सर्व घटनांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही सामान्य जनतेची फसवणूक काही थांबत नाही. अशातच मुंबई शहरातील पोलिस कॉन्स्टेबलसोबत धक्कदायक प्रकार घडला आहे. सायबर ठकांनी एका कॉन्स्टेबलच्या खिशातून फसवणूक करून हजारो रुपये उकळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल सचिन चव्हाण (वर्षे ५२) यांना ९ सप्टेंबर रोजी अज्ञात क्रमांकावरून फोन आला. चव्हाण यांनी फोन उचलला असता त्यांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यावर चुकून ३० हजार रुपये पाठवल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र तसे काही नव्हते.

तरीही या अज्ञात व्यक्तीने चव्हाण यांना पैसे परत करण्याची विनंती केली. सुरुवातीला चव्हाण यांनी ५,००० रुपये पाठवले. त्यानंतर ठकाने लिंक पाठवून कोड टाकण्यास सांगितले. कोड भरताच त्यांच्या एचडीएफसी पगार खात्यातून आधी ७७,०९१ रुपये आणि नंतर आणखी १२,०१२ रूपये वजा झाले. काही वेळानंतर चव्हाण यांना संशय आला.

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी तात्काळ १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर सायबर लुटारू पोलीस खात्याला जर सहज लुबाडत असतील तर सामान्य जनता तरी कुठे सुरक्षित? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार

Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला काय करावे अन् काय करू नये?

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या आधी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स, घरात वाढेल नफा आणि संपत्ती

Beed: ४ महिन्यांच्या लेकीला बुडवलं अन् वडिलांनी आयुष्याचा दोर कापला, घरगुती कारण की आणखी काय? गूढ वाढलं

Thane To Trimbakeshwar Travel: ठाण्यापासून त्र्यंबकेश्वर पर्यंतचा प्रवास कसा कराल? कार, टॅक्सी, बस आणि रेल्वे पर्याय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT