Customs Seized 10 KG Gold  Saam Tv
क्राईम

Mumbai Breaking: मोठी बातमी! मुंबई विमानतळावरून १० किलो सोनं जप्त, कस्टम विभागाची कारवाई

Customs Seized 10 KG Gold Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून १० किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाढ, साम टीव्ही मुंबई

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कामगिरी केली आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने तब्बल १० किलो सोन जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये कस्टम विभागाने ९.७६ किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत. मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत ६.७५ कोटी रुपये असल्याची माहिती (Mumbai News) मिळतेय. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून सुरू होती. प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली (Mumbai Airport) आहे.

याप्रकरणी कस्टम विभागाने ८८ लाख रुपयांच्या किमतीचे परदेशी चलन देखील जप्त केल आहे. एकूण २० प्रकरणांमध्ये कस्टम्स विभागाने ही कारवाई केलेली आहे. आता अटकेनंतर या चार आरोपींची सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये चौकशी सुरू (Mumbai Airport Customs Seized 10 KG Gold) आहे. या सर्वावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी काही गुन्हेगार जाळ्यात सापडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

यापूर्वी मुंबई कस्टम विभागाने १० मे रोजी देखील मोठी कारवाई केली होती. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कस्टम विभागाने ७.४४ कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं होतं. एकूण १८ प्रकरणांमध्ये ११.६२ किलो सोन जप्त (Gold Smuggling) करण्यात आलं होतं. यामध्ये सोन्याचे दागिने, सोन्याची पूड , विटा आणि सोन्याचं मेण स्वरूपात सोन्याची तस्करी करण्यात येत होती.

याप्रकरणी कस्टम विभागाने सात प्रवाशांना अटक करून १२ लाख रूपयांची रोकड जप्त केली होती. गुदद्वार, अंतर्वस्त्र तसेच कपडे आणि बुटामध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं (Crime News) होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT