Haryana Crime Saam Tv
क्राईम

Crime: बायकोकडून नवऱ्याची हत्या, चाकूने पोट फाडलं, आतड्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरल्या, नंतर...

Haryana Crime: हरियाणामध्ये बायकोने नवऱ्याची हत्या केली. चाकूने पोट फाडून तिने आतड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरल्या. त्यानंतर तिने बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Priya More
  • हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये बायकोकडून नवऱ्याची हत्या

  • धारदार चाकूने हल्ला करत आधी नवऱ्याला संपवलं

  • चाकूने पोट फाडून आतड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरल्या

  • नवऱ्याच्या हत्येनंतर महिलेने छतावरून खाली उडी मारली

हरियाणामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. बायकोने नवऱ्याची हत्या केली. हत्येनंतर चाकूच्या सहाय्याने तिने नवऱ्याचे पोट फाडले आणि आतड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरल्या तेवढ्यात घराचा मालक आला आणि ही संतापजनक घटना उघडकीस आली. अंगावर काटा आणणारी ही घटना हरियाणाच्या कुरूक्षेत्रमध्ये रविवारी घडली. महिलेने नवऱ्याची इतक्या निर्घृणपणे हत्या का केली? यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश असे हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विमल असे आरोपी महिलेचे नाव आहे. राजेश आणि विमल गेल्या एका वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होते. राजेश उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो कुरूक्षेत्रच्या पेहोवा रोड येथे स्थित एका वॉटर ट्रेडिंग कंपनीत सप्लाई डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. दोघांचे लग्न अनेक वर्षांपूर्वी झाले होते. पण त्यांना मुलबाळ नव्हते.

घरमालकाने सांगितले की, रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राजेश आणि त्याच्या बायकोमध्ये भांडण सुरू असल्याचा आवाज येत होता. भांडणाचा आवाज ऐकून मी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. घरात डोकावलं तर आतमधील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. राजेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटावर चाकूने अनेक वेळा वार करण्यात आले होते. तर त्याची बायको विमला देवी नवऱ्याच्या पोटातून बाहेर आलेल्या आतड्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरत होती.

घरमालक आल्याचे पाहून विमल प्रचंड घाबरली. तिने लगेच बाल्कनीतून खाली उडी मारली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या तिचा जबाब नोंदवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राजेशच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामधून धक्कादायक माहिती उघड झाली. त्याचे पोट धारदार शस्त्राने ३५ सेंटीमीटर लांब कापले गेले होते. त्यामुळे त्याच्या आतड्या बाहेर आल्या. त्याच्या यकृताचा मोठा भाग आणि मूत्रपिंड गायब झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून राजेशची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. घरमालकाने सांगितले की, या नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत होते. विमला देवी भूतबाधा आणि जादूटोणा यासारखे प्रकार करत होती. राजेशच्या हत्येमागचे खरं कारण अद्याप समोर आले नाही पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Detox Drinks : डिटॉक्स ड्रिंक्स प्या आणि दिवसभर राहा फ्रेश; घरच्या घरी बनवा हे 6 हेल्दी ड्रिंक्स

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली

पुणेकरांसाठी मोठी बातमी! आता वाहनांच्या पाटीवर MH 12 ऐवजी दिसणार 'हा' नवा कोड; भारतात पहिल्यांदाच प्रयोग

Shocking : बाप नाही हैवान! घरात कोणीही नसल्याची संधी साधून पोटच्या मुलीवर अत्याचार ; जळगावमधील धक्कादायक घटना

Sugar Price Hike : दिवाळीत साखर 100 पार...? ऐन सणासुदीत साखरेचा गोडवा महागणार!

SCROLL FOR NEXT