Crime news Saam Digital
क्राईम

Crime news: एकाच बेडवर आढळले ७ मृतदेह... का कवटाळलं असेल मृत्यूला? कारण ऐकून धक्काच बसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime news

गुजरातच्या सुरतमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका फ्लॅटमध्ये सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असून पोलिसांनी सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सुरतमधील अडाजन भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कनुभाई सोळंकी यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये कनुभाई आपल्या कुटुंबासोबत राहात होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी एक मृतदेह गळ्याला फास लागून लटकत होता. मनीष उर्फ शांतू सोलंकी अंसं त्याचं नाव असून कनुभाई यांचा तो मुलगा आहे. बाकीचे मृतदेह बेडवर पडलेले होते. त्यामध्ये कनुभाई , शोभनाबेन, रिटा, दिशा, काव्या आणि कुशल यांचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शोभनाबेन कनुभाई यांच्या पत्नी आहेत. तर रिटा मनिषची पत्नी आहे. दिशा आणि काव्या मनीष च्या मुली आहेत. तर कुशल सगळ्यात लहान मुलगा आहे. या सर्वांचे मृतदेह बेडवर आढळून आले.

मनीष सोलंकी याचा फर्निचरचा व्यवसाय होता आणि आर्थिक अडचणीतून सामूहिक आत्यहत्येचं पाऊल उचलल्याची शक्यती आहे. कारण घटनास्थळी पोलिसांना एक चिट्ठी मिळाली असून तला मजकून त्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शिवाय बाजूलाच एक रिकामी बाटली सापडली आहे. त्यात विष असल्याची शक्यता असून तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे.

मनीष सोलंकी यांनी आधी कुटुंबातल्या सर्वांना विष दिलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी आशंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी सध्या याविषयी काहीही बोलणे घाईचे होईल. फ्लॅट सील करण्यात आला असून पोलीस कसून चौकशी करत असल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT