crime news Saam Tv
क्राईम

ChatGPT वरून माहिती घेतली, १६ वर्षाच्या मुलाने आयुष्य संपवलं, पालकांची कोर्टात धाव

San Francisco News : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये १६ वर्षीय अ‍ॅडम रेनने चॅटजीपीटीच्या मदतीने आत्महत्या केली. पालकांनी ओपनएआयवर खटला दाखल करत मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • सॅन फ्रान्सिस्कोतील १६ वर्षीय अ‍ॅडम रेनने चॅटजीपीटीच्या मदतीने आत्महत्या केली.

  • पालकांनी ओपनएआयवर चुकीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्याची मागणी केली.

  • चॅटजीपीटीने आत्महत्येच्या पद्धती शिकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

  • या घटनेनंतर एआयच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लहान मुले सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचं दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळत मात्र एका १६ वर्षीय मुलाने हद्दच केली. सॅन फ्रान्सिस्को मधील १६ वर्षीय मुलाने चॅटजीपीटी या तंत्रज्ञानाची मदत घेऊन चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव अ‍ॅडम रेन असं आहे. त्याच्या पालकांनी सॅन फ्रान्सिस्को राज्य न्यायालयात खटला दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणाऱ्या मॅथ्यू आणि मारिया रेन यांच्या मुलाने चॅट जीपीटीचा वापर करून आत्महत्या कशी करतात याची वारंवार माहिती मिळवली. तसेच पालकांच्या दारूच्या कॅबिनेटमधून दारू कशी चोरून घ्यायची आणि अयशस्वी आत्महत्येच्या प्रयत्नाचे पुरावे कसे लपवायचे याबद्दल चॅट जीपीटीला सूचना दिल्या. चॅट जीपीटी जे जे सांगेल त्या गोष्टी अ‍ॅडमने केल्या. असा आरोप अ‍ॅडमच्या पालकांनी केला आहे.

मॅथ्यू आणि मारिया रेन यांनी रेन याच्या मृत्यूनंतर सॅन फ्रान्सिस्को राज्य न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्यात त्यांनी १६ वर्षीय अ‍ॅडम रेनचा चॅटजीपीटीशी अनेक महिने आत्महत्येबद्दल चर्चा केल्यानंतर ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. या खटल्यात ओपनएआयला चुकीच्या मृत्यूसाठी आणि उत्पादन सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन करण्यासाठी जबाबदार धरण्याचा आणि आर्थिक नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेने पालकवर्गाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपली मुले काय करतात यावर पालकांचं नियंत्रण असणं आवश्यक आहे. दरम्यान लहानमुलांमध्ये तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन नैराश्याचं प्रमाण वाढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

SCROLL FOR NEXT