Tragic incident in Chhattisgarh: Tikuram Sen ended his life after wife refused to prepare egg curry AI
क्राईम

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

Man Ends Life in Chhattisgarh: छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडलीय. एका ४० वर्षीय व्यक्तीने पत्नीशी झालेल्या वादानंतर आत्महत्या केलीय. 'करू भात' सण आणि तिच्या येणाऱ्या उपवासाचे कारण देत तिने अंडी करी बनवण्यास नकार दिला होता.

Bharat Jadhav

  • छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील शंकरा गावात धक्कादायक आत्महत्या.

  • टिकुराम सेन याने अंडाकरीवरून पत्नीशी झालेल्या वादानंतर गळफास घेतला.

  • पत्नीने करू भात सण आणि उपवासामुळे अंडाकरी बनवण्यास नकार दिला.

पत्नीने अंडी करी बनवण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केलीय. ही घटना छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात घडलीय. पत्नीनं सोमवारी अंडाकरी बनवण्यास नकारनं दिल्यानं नाराज झालेल्या नवरा घराबाहेर गेला आणि त्याने घराजवळील झाडाला गळफास लावला.

ही धक्कायदायक घटना धमतरी जिल्ह्यातील सिहवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरा गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव, टिकुराम सेन (वय ४०) आहे. टिकूराम सेन यांनी घरी जेवणासाठी अंडी आणली होती. घरी आल्यानंतर त्याने बायकोला अंडी करी बनवण्यास सांगितलं. पण करू भातचा सण होता आणि ती दुसऱ्या दिवशी उपवास करणार होती.

त्यामुळे त्याच्या बायकोनं अंडा करी बनवण्यास नकार दिला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचा राग आल्यानं त्याने घराबाहेर जात आत्महत्या केली. "छत्तीसगडमधील विवाहित महिला तीज सणाच्या आदल्या दिवशी 'करू भात' (एक कडू जेवण असते त्यात कारल्याचा पदार्थ असतो) ते जेवण महिला खात असतात.

विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी उपवास करतात. दुसऱ्या दिवशी 'निर्जला' उपवास करण्यापूर्वी ते शेवटचे जेवण म्हणून करू भात खात असतात," असे अधिकाऱ्याने सांगितलं.

वडिलांच्या कर्जापायी मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव

महाराष्ट्रातील रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली होती. मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. रत्नागिरी शहरातील शांतीनगर परिसरात ही घटना घडलीय. पूजा शशिकांत तेली असं मृत महिलेचे नाव आहे. आरोपी मुलाचे नाव अनिकेत तेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT