Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या; पोलिसांना भलताच संशय

Hyderabad Woman Killed In Australia: ऑस्ट्रेलियामध्ये एका भारतीय महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Rohini Gudaghe

Marathi Crime News

ऑस्ट्रेलियात हैदराबाद येथील एका 36 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली (Hyderabad Woman Killed In Australia) आहे. या महिलेच्या पतीवर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बकले येथे एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला चाकं असलेल्या कचऱ्याच्या डब्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांना ही महिला भारतीय असल्याची ओळख पटली.  (Latest Crime News)

चैथन्या मधगनी असं मृत महिलेचं नाव (Crime News) आहे. ही महिला पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिलेची हत्या

व्हिक्टोरिया पोलिसांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 9 मार्च रोजी दुपारी विन्चेल्सीजवळील बकले येथे एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेचा तपास होमिसाईड स्क्वॉडचे पथक करत आहे. या महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला जात आहे. निवासस्थानी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

व्हिक्टोरिया पोलिसांनी पुढे सांगितले की, तपास पथक महिलेचा मृत्यू संशयास्पद मानत आहे. या महिलेचा पती ऑस्ट्रेलिया सोडून पळून गेलेला आहे. तो अचानक हैद्राबादला रवाना झाला (Woman Killed) होता. त्यांच्या मुलाला त्याने पत्नीच्या आईवडिलांकडे सोपवले आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

जावयावर केला हत्येचा आरोप

उप्पलचे आमदार बंदरी लक्ष्मा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला त्यांच्या मतदारसंघातील आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या पालकांची भेट ( Hyderabad News) घेतली. त्यांंनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, महिलेच्या पालकांच्या विनंतीवरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या कार्यालयालाही माहिती दिली आहे, असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, महिलेच्या पालकांनी जावयावर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT