Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: सून तोकडे कपडे घालून रिल्स बनवायची; वैतागलेल्या सासू-सासऱ्याची आत्महत्या

Crime News: तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्या सूनेमुळं वाद टोकाला गेला आणि नैराश्यातून सासू-सासऱ्याने टोकाचे पाऊल उचललं. या दोघांनीही आत्महत्या केली.

Shruti Vilas Kadam

Crime News: तोकड्या कपड्यांमध्ये रिल्स काढून ते सोशल मीडियावर अपलोड करणे आणि सूनेच्या मॉर्डन राहणीमानावरून होणारा कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतं, याची प्रचिती देणारी धक्कादायक घटना हरयाणात घडली आहे. सून तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर रिल्स शेअर करायची. यावरून सासरच्या मंडळींमध्ये सतत खटके उडत होते. अखेर हा वाद इतका टोकाला गेला की वैतागून सासू-सासऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.

ही घटना हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील नारा गावात घडली. राजेश (४६) आणि सुमन (४४) यांचा एकुलता एक मुलगा आशिष याचे लग्न जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीतील स्नेहाशी झाले होते. इंस्टाग्रामवरून झालेली ओळख पुढे प्रेमात बदलली आणि दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर स्नेहाच्या मॉर्डन जीवनशैलीमुळे गावात नाचक्की होत असल्यामुळं सासू- सासऱ्यांसोबत सतत वाद होत होता.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, स्नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती रील्स तयार करत होती आणि मॉर्डन कपडे परिधान करत होती. तिच्या या वागण्यावरून घरात सतत वाद होत होते. राजेश आणि सुमन यांना सूनेचे वागणे आवडत नसल्याने घरातील वातावरण तणावाचे झाले होते.

सासू-सासऱ्यांनी या मॉडर्न सूनेवर मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचाही आरोप केला होता. त्यातच मुलगा आशिष देखील पत्नीची बाजू घेत होता आणि आई-वडिलांशी चांगलं वागत नव्हता. शनिवारी दुपारी घरात पुन्हा मोठा वाद झाला. त्यानंतर नैराश्यातून राजेश आणि सुमन यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रकृती बिघडल्यानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमन यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर राजेश यांना पुढील उपचारांसाठी रोहतक पीजीआयमध्ये हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांचाही मृत्यू झाला.

या प्रकरणी मतलाउडा पोलीस यांनी स्नेहा, तिचे आई-वडील आणि बहिणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT