एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बिहारच्या दरभंगा येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने १० जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी शौचालयासाठी गेलेल्या तरुणीवर गावातील तरुणांनी अत्याचार केल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे.
पीडितेच्या गावातील तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अत्याचारामुळे पीडिता बेशुद्ध पडली, त्यानंतर आरोपी तिला त्या अवस्थेत सोडून फरार झाले. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला. त्यानंतर आरोपींकडून पीडित तरुणीच्या घरच्यांना फोनवरुन धमकावण्यात आल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली आहे.
स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिचा जवाब नोंदवला जाणार आहे. ही घटना १५ मार्च रोजी घडल्याचे म्हटले जात आहे. २५ मार्च रोजी बहेरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी संध्याकाळी पीडित तरुणी शौचालयासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध सुरु असताना पीडिता बेशुद्ध अवस्थेत सापडली.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथेही पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावर पोलिसांना रक्ताचे अनेक डाग आढळून आले आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेला न्यायालयात हजर केले जाणार आहेत. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.