Crime News Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
क्राईम

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तरंजित थरार; २५ वर्षीय तरुणाला चाकू भोसकला, हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद

Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे दोन गटांतील वादातून चाकू हल्ला झाला. या घटनेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

Shruti Vilas Kadam

Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन गटांमधील वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तर, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड पोलीस ठाण्यासमोरील रेणुका ज्वेलर्स परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अचानक हिंसक वळणावर गेला. दोन्ही गटांतील काही जणांनी धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करु लागले. या हल्ल्यात नविद शेख अकरम (वय २५) तरुण गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर अकरमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. नातेवाईकांनी वेळ वाया जाऊ नये म्हणून त्याला मोटरसायकलवरून दवाखान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या हाणामारीत आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून त्याच्या जबाबाची नोंद घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. या फुटेजमध्ये हल्लेखोरांकडून करण्यात आलेली मारहाण आणि गोंधळ स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण; वाहनचालक त्रस्त, नागरिकांचा संताप

Torna Fort : गुप्त खजिना, भव्य रचना अन् गौरवशाली इतिहास; तोरणा किल्ल्याच्या 'या' गोष्टी जाणून तुम्हीही व्हाल थक्क

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार, पण कधीपर्यंत? जाणून घ्या

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील जलसाठा ९१.४७ टक्क्यांवर, खडकवासला धरण शंभर टक्के भरले

SCROLL FOR NEXT