Honeytrap Google
क्राईम

Honeytrap: आर्मी कँटीनचा संचालक अडकला पाकिस्तानी तरुणीच्या जाळ्यात, गुप्त माहिती करत होता शेअर

Pakistani Spy Honeytrap: बिकानेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आर्मी कॅन्टीनचा संचालक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडला गेला आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

Crime News Army Canteen Pakistani Spy

राजस्थानमधील बिकानेर (Bikaner) येथील लष्करी तळावर एका पाकिस्तानी गुप्तहेराला (Pakistani Spy) पकडण्यात आलं आहे. हा पाकिस्तानी गुप्तहेर दुसरा कोणी नसून लष्कराच्या कॅन्टीनचा संचालक विक्रम सिंग आहे. विक्रम काही दिवसांपासून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. (Latest Crime News)

ही महिला दिसायला अतिशय संपर्कात होती. विक्रम तिच्या सौंदर्याने आकर्षित झाला. तिच्या प्रेमापोटी विक्रमने देशाची गुप्त आणि संवेदनशील माहिती तिच्यासोबत शेअर करण्यास सुरुवात (Crime News) केली. राजस्थान इंटेलिजन्सला याची माहिती मिळाली. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने या गुप्तहेराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम हा बिकानेरच्या डुंगरगड तहसीलमधील लाखासर भागातील बस या गावचा रहिवासी आहे. त्याच्याकडे महाजन आर्मी ( Army Canteen) परिसरातील कॅन्टीनचे कंत्राट होते. तो लष्कराच्या परिसरात कॅन्टीन चालवायचा. संधी पाहून लष्कराच्या परिसरातून संवेदनशील फोटो आणि कागदपत्रे काढून पाकिस्तानी हँडलरकडे पाठवत होता. राजस्थान इंटेलिजन्स टीमने त्याच्या संभाषणाचा मागोवा घेतला, तेव्हा ही बाब समोर आली.

राजस्थान इंटेलिजन्सने ही संपूर्ण घटना मिलिटरी इंटेलिजन्स बिकानेरला शेअर केली. त्यानंतर संयुक्त कारवाईत या गुप्तहेराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. अटकेच्या वेळी तो एका पाकिस्तानी महिलेला काही छायाचित्रे पाठवण्याचा प्रयत्न करत (Army Canteen Pakistani Spy) होता. राजस्थान इंटेलिजन्सचे अतिरिक्त महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमचा मोबाईल अनेक दिवसांपासून ट्रॅक केला जात होता. त्याच्या फोनवरचे सगळे संभाषण त्यांना ऐकू येत होते.

आरोपी ठरला हनीट्रॅपचा बळी

यावेळी पाकिस्तानी महिलेसोबतचं त्याचं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलंय. यावेळी आरोपी हनीट्रॅपचा बळी (Honeytrap) असल्याचं उघड झालं. त्याला हनीट्रॅपचा बळी बनवणाऱ्या पाकिस्तानी महिलेने त्याला गुप्तचर माहिती काढण्याचं प्रशिक्षणही दिलं होतं. आरोपी विक्रमला अटक केल्यानंतर त्याची गंभीरपणे चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर (Pakistani Spy Female Handler) आल्या.

काही दिवसांपूर्वी विक्रमने फेसबुकच्या माध्यमातून या महिलेशी संपर्क साधल्याचं समोर आलं आहे. मेसेंजरवर चॅटिंग करत असताना दोघांनी आपले मोबाईल नंबर शेअर केले होते. त्यानंतर त्यांचं खासगी बोलणं सुरू झालं (Latest Crime News) होतं. दरम्यान, या महिलेने विक्रमचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. आता ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला देशविरोधी कारवाया करण्यास भाग पाडलं असल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Viral Video: रिल्सच्या नादात जीवाशी खेळ, उंच पुलावरून चालत चालत निघाला, मग पुढे काय झालं तुम्हीच पाहा

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

Tanaji Sawant : विकास न झालेलं गाव दाखवा आणि १ लाख मिळवा, तानाजी सावंतांचे मतदारांना चॅलेंज!

SCROLL FOR NEXT