Gujrat Crime News saam tv
क्राईम

Gujarat Crime News: दुसऱ्या लग्नाच्या खुळापायी पोटच्या पोराला संपवलं; ७६ वर्षाचा बाप बनला हैवान

Father Kills Son For Second Marriage : दुसऱ्या लग्नाच्या हट्टापायी एका ७६ वर्षाच्या व्यक्तीने आपल्या पोटच्या पोराचा जीव घेतलाय. पिस्तूलमधील गोळ्या झाडत त्याची हत्या केलीय.

Bharat Jadhav

दुसऱ्या लग्नाचा हट्ट पूर्ण करू देत नसल्यानं एका ७६ वर्षाच्या व्यक्तीने आपल्या पोराच्या छातीवर गोळ्या झाडल्या. ही घटना घडलीय गुजरातमधील राजकोटमध्ये. येथे राहणाऱ्या ७६ वर्षीय राम बोरीचा यांनी आपल्या पोटच्या पोरावर लग्नासाठी गोळ्या झाडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वडिलांचे नाव राम बोरीचा असून त्यांना दुसरं लग्न करायचं होतं. दुसरं लग्न करण्याचा हट्ट त्यांनी आपल्या घरच्या व्यक्तींकडे लावून धरला मात्र मुलाने त्याला विरोध केला. त्याचा राग मनात धरत राम बोरी यांनी पोटच्या पोरावर गोळ्या झाडत त्याचा खून केला. प्रताप बोरी असं मृत मुलाचं नाव आहे. मुलगा प्रताप याचं लग्न झालंय, त्याला मुलं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम बोरीचा यांची पत्नी २० वर्षांपूर्वी वारली होती. बरेच दिवस एकटेपणात घालवल्यानंतर त्यांना २० वर्षांनंतर लग्न करू वाटलं. आपल्यालापुन्हा लग्न करायचं आहे, असा निर्णय त्यांनी आपल्या घरच्यांसमोर सांगितला. पण मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध दर्शवला.

वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे समाजातील लोकांमध्ये आपली इज्जत राहणार नाही. आपल्या घराची प्रतिष्ठ खराब होईल, असं राम बोरीस यांना वाटत होतं. या लग्नाच्या विषयावरून वारंवार बोरीस कुटुंबात वाद होत होते. आपली इच्छा पुर्ण होऊ देत नाही, असा राग राम बोरी याच्या मनात होता.

अशी केली मुलाची हत्या

एके दिवशी प्रतापची पत्नी जया सासरे राम बोरी यांना चहा देण्यासाठी गेली. त्यावेळी त्यांनी पाहिलं की, राम बोरी यांनी मुलावर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर राम यांनी सून जयालाही मारण्याचा प्रयत्न केला.पण त्या तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. मुलावर गोळ्या झाडल्यानंतर राम बोरी हे कुठेच गेले नाहीत. ते त्या जागी असलेल्या टेबलावर बसून राहिले. प्रतापचा मुलगा जयदीप घरी आला तेव्हा त्याला त्याचे वडील रक्ताने माखलेले आढळले.

तर त्याचे आजोबा टेबलावर बसले दिसले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि राम यांना अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेले पिस्तूलही जप्त केलं. चौकशीदरम्यान राम यांनी आपल्या मुलाच्या हत्येबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. आपल्या मुलाने त्रास दिला म्हणून मी त्याचा खून केला असं राम बोरी यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT