Gujarat News saam tv
क्राईम

Crime News: १४ वर्षीय मुलीवर बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Gujarat Crime News: गुजरातमध्ये भयंकर घटना घडली. १४ वर्षीय मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी बलात्कार केला. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More
  • गुजरातमध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

  • पीडित मुलीच्या वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

  • घरी बोलावून २ वेळा बलात्कार केला

  • पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला

गुजरातमध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. वर्गमैत्रिणीच्या वडिलांनी हे भयंकर कृत्य केले. मुलीचे अपरहण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आरोपीने मुलीशी संपर्क वाढवण्यासाठी तिला मोबाईल गिफ्ट केला होता. पीडित मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमीष दाखवत पळवून नेले होते. या प्रकरणी कापोद्रा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीमध्ये शिकणारी पीडित मुलगी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहते. तिची वर्गमैत्रिण चौथ्या मजल्यावर राहते. या दोन्ही मुली इन्स्टाग्रामवर वारंवार बोलत होत्या. पीडित मुलगी तिच्या आईचा फोन वापरत होती आणि तिची वर्गमैत्रिण तिच्या वडिलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होती. यामुळे आरोपीला पीडित मुलीशी संपर्क साधण्यात यश आले.

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात ही बाब आली. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मैत्रिणीने वडील यांच्यात चुकीचे बोलणे सुरू आहे हे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने वडिलांना याबाबत सांगितले. ज्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या हातात मोबाइल देणं बंद केले.

७ जुलैला पीडित मुलीच्या बहिणीला तिच्या जवळ एक मोबाइल दिसून आला. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने सांगितले की, माझ्या वर्गमैत्रिणीच्या वडिलांनी फोन विकत घेऊन दिला. ते दोघे गेल्या ६ महिन्यांपासून व्हॉट्सअपवर गुपचूप गप्पा मारत होते.

आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. घरामध्ये कुणी नसताना आरोपीने दोन वेळा पीडित मुलीवर बलात्कार केला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी कापोद्रा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या घटनेमुळे गुजरात हादरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT