CrimeNEWS Saam Tv
क्राईम

Crime News : छेड काढली, एकटीला गाठून किस केलं; शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

Crime News In MP : छेडछाडीच्या घटनेचा परिणाम पीडित मुलीवर झाला. तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Yash Shirke

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पवित्र्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे तिच्या शिक्षकाने वर्गाबाहेर चुंबन घेतले. या प्रकाराने घाबरुन विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृत्यूपूर्वी तिने घटलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भोपालच्या सुखी सेवनिया या भागात घटली आहे. १५ वर्षीय विद्यार्थिनी एका कॉन्वेन्ट शाळेत अकरावी इयत्तेमध्ये शिकत होती. २५ जानेवारी रोजी शाळा सुटल्यानंतर तिच्या शिक्षकाने तिची छेड काढली आणि जबरदस्ती करत तिचे चुंबन घेतले. या घटनेमुळे पीडित मुलगी सुन्न झाली आणि घरी पळून गेली.

शिक्षकाच्या तावडीतून सुटून ती घरी पोहोचली. घडलेल्या घटनेचा परिणाम तिच्यावर झाला होता. त्याच प्रभावात असताना तिने विष पिऊन आत्महत्या केली. थोड्या वेळात तिला उलट्या व्हायला लागल्या, तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पण मरणापूर्वी पीडितेने झालेल्या अत्याचाराबद्दल तिच्या वडिलांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव नीतेश कुमार असे आहे. तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. तो मूळचा बिहारचा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून स्थानिक पोलीस मागच्या आठवड्यापासून त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT