Police arrest woman in Kawardha after minor boy assault case linked to social media contact. Saam Tv
क्राईम

Crime News : धक्कादायक! विवाहित महिलेकडून १६ वर्षीय मुलावर बलात्कार; हॉटेलवर नेलं अन्...

Chhattisgarh Minor Boy Rape News : छत्तीसगडमधील धक्कादायक घटनेत एका विवाहित महिलेने १६ वर्षीय मुलावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • कवर्ध्यात विवाहित महिलेने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना

  • सोशल मीडियावरून ओळख वाढवत मुलाला हॉटेलमध्ये बोलावले

  • मुलाच्या वागण्यात बदल दिसल्याने कुटुंबीयांनी उघडकीस आणला प्रकार

  • पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला

छत्तीसगडच्या कवर्धा येथे एका २६ वर्षीय विवाहित महिलेने १६ वर्षीय मुलावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर ओळख वाढवत आरोपी महिलेने पीडित मुलाला हॉटेलवर बोलावून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेने मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना १ मार्च रोजी उघडकीस आली. २६ वर्षीय महिलेने पीडित मुलासोबत सोशल मीडियावर ओळख निर्माण केली. त्यानंतर दोघांमधील संवाद वाढला. या संवादातून महिलेने मुलाला एका हॉटेलवर भेटण्याचा आग्रह केला. मैत्री खातर हा मुलगा तयार झाला. त्यानंतर पीडित महिलेला भेटण्यासाठी मुलगा हॉटेलवर पोचला. यादरम्यान महिलेने त्याच्यावर अमानुष अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

महिलेच्या भीतीने पीडित मुलगा घाबरला आणि मानसिकदृष्ट्या खचला. त्याच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवल्याने कुटुंबीयांनी त्याची चौकशी केली. या चौकशीत मुलाने त्याच्यासोबत झालेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितले.

त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या, तसेच तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर मुलांकडे पालकांचं दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fake Lady Police Arrested: पुण्यात 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश! तरुणीकडून दोन पोलिस गणवेश जप्त

पिंपल्स आणि काळे डाग होतील गायब! ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा संत्र्याच्या पावडरचा जादुई उपाय

Maharashtra News Live Update: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Famous Actress : दिग्दर्शकाचं किळसवाणं कृत्य; प्रसिद्ध अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श, घाबरून बॉलिवूड इंडस्ट्री सोडली

Shocking : बीड हादरलं! दोन तरूणांकडून तरुणीवर बलात्कार; एकानं लॉजवर नेलं, दुसऱ्यानं गुंगीचं औषध दिलं, ब्लॅकमेल करून सोनंही लुटलं

SCROLL FOR NEXT